Ronald Wayne:: ॲपल म्हटलं की डोळ्यासमोर येतं स्टीव्ह जॉब्स, पण ॲपलचा असा एक संस्थापक(Apple Founder) जो फक्त १२ दिवसात कंपनी सोडून गेला. जर त्याने आपला हिस्सा विकला नसता तर तो आज असता अब्जाधीश चला तर मंग जाणून घेऊया काय आहे Ronald Wayne – रोनाल्ड वेन या मागची गोष्ट…
ॲपलची(Apple) सुरुवात.
ॲपल म्हटलं की डोळ्यासमोर येतं स्टीव्ह जॉब्स डिझाईन आणि इनोवेशन पण ॲपल ची सुरुवात करणारा फक्त स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वोझनिक(Steve Wozniak) नव्हते तर अजून एक त्यांचा तिसरा पार्टनर होता ज्यांनी एप्पलची सुरुवात केली होती. स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वोझनिकयांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती ज्याने एप्पल च्या सुरुवातीच्या काळामध्ये कंपनी सुरू करण्यास हातभार लावला होता ते नाव म्हणजे रोनाल्ड वेन(Ronald Wayne).सुरुवातीच्या काळातील या दोन स्टीव्हचा पार्टनर पण आज खूप थोड्या लोकांना यांचं नाव एप्पल चे फाउंडर म्हणून माहित आहे.
1976 साली स्टिव्ह जॉब्स,स्टिव्ह वोझनिक आणि रोनाल्ड यांनी मिळून एप्पल ची सुरुवात केली होती.
कोण होता रोनाल्ड वेन (Ronald Wayne)?
रोनाल्ड वेनचा जन्म 1934 साली झाला होता एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच ते हुशार विद्यार्थी होता.न्यूयॉर्क मधील औद्योगिक कला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर वयाच्या तिशीपर्यंत वेगवेगळे टेक्निकल जॉब केल्यानंतर 1971 साली त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याने सायन नावाची एक कंपनी सुरू केली ही कंपनी ही कंपनी लास-वेगास मध्ये स्लॉट मशीन चालवायची. स्लॉट मशीन म्हणजे मशीन मध्ये कॉइन टाकायचा मग मशीन मधून वस्तू बाहेर येत जसं की चॉकलेट किंवा कोणते पेय किंवा पैसे टाकून ठराविक काळासाठी वेगवेगळे गेम्स खेळता येत पण हा व्यवसाय फेल केला त्यानंतर रोनाल्डला वाटायला लागलं की बिजनेस करण हा आपला बिजनेस नाही आपण इंजिनिअर आहोत आणि हे कामच आपल्यासाठी योग्य आहे.
ह्या स्लॉट मशीनच्या अपयशातून त्याला चांगलीच ठेच लागली होती आणि पुन्हा त्याला अशी रिस्क घ्यायची नव्हती यानंतर बिझनेस न करता तो जॉबच बराय ह्या निर्णयावर आला आणि त्याने अटारी या व्हिडिओ गेम कंपनी मध्ये नोकरी सुरू केली.
अटारी कंपनीमध्ये असतानाच त्याची भेट स्टिव्ह जॉब बरोबर झाली, रोनाल्डलाही तसा कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होताचआणि मग काय जॉब ला भेटून त्याला अजून त्यात इंटरेस्ट निर्माण झाला. जेव्हा कंपनीची स्थापना करायचा ठरलं तेव्हा दोन्ही स्टील प्रत्येकी 45-45 टक्के हिस्सा घेतील आणि आणि उरलेला दहा टक्के हिस्सा हा रोनाल्ड ला देण्याचा ठरलं.
तिसरा व्यक्ती यासाठी की जर दोन्ही स्टिव्ह मध्ये जर एखाद्या गोष्टीवर मतभेद झाले तर मग रोनाल्ड त्याचं मत त्या गोष्टीवर देईल आणि मेजॉरिटीवर निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर स्टीव्ह जॉब्स हा 21 वर्षाचा तरुण आणि स्टिव्ह वोझनिक 25 वर्षाचा होता. यांना तसा 41 वर्षाच्या रोनालच्या तुलनेत दुनियादारीचा कमी अनुभव होता त्यामुळे रोनाल्ड चा सल्ला वेळोवेळी उपयोगी पडेल हा त्यामागचा हेतू.
अटारी मध्ये काम करत असताना कंपनीचे लीगल डॉक्युमेंट्स बनवायचा अनुभवला होता तोच अनुभव वापरून रोनाल्डने एप्पल चे पार्टनरशिप डॉक्युमेंट्स बनवले. कंपनीचा पहिला लोगो ज्यामध्ये आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला आहे तो लोगो रोनाल्ड नेच डिझाईन केला होता.21-22 वर्षाचा स्टीव्ह जॉब्स रोनाल्ड वेगवेगळ्या गोष्टीवर सल्ला मागत असेल आणि आपल्या अनुभवाच्या आधारे रोनाल्ड ते सल्ला देत असे.एप्पल ची सुरुवात करण्याअगोदर स्टीव्ह जॉब ने रोनाल्डला एकदा विचारलं होतं की आपण तो बुडालेले स्लॉट मशीनचा बिजनेस पुन्हा सुरू करायचा का असा सल्ला विचारला होता त्यावर त्याने वने स्पष्टपणे त्यास नकार दिला होता .
Apple Founder Ronald Wayne ने का सोडली कंपनी?
रोनाल्डो चे सुरुवातीला पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट लिहिले होते त्यात त्यांच्या भूमिका स्पष्ट मांडल्या होत्या.स्टीव्ह जॉब इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि मार्केटिंग बघेल, स्टिव्ह वोझनिक इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग कडे लक्ष देईल आणि रोनाल्ड हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डॉक्युमेंटेशनचा काम करेन.
त्यांनी पैसे उभे केले आणि एप्पल-1 कम्प्युटर तयार केला, सुरुवातीला बाईट शॉप(Byte Shop) ह्या कम्प्युटर दुकानाला 50 कम्प्युटर संच विकले आणि त्यांनी लगेच 200 कम्प्युटर बनवले आणि ते आठ नऊ महिन्यांमध्ये विकले गेले.
पण कंपनीच्या करारावर सही केल्यानंतर फक्त बारा दिवसांमध्ये रोनाल्डने ॲपल चे सर्व शेअर्स दोन्हीला फक्त 800 डॉलर मध्ये विकून टाकले. ॲपल ची आजची स्थिती पाहता कोणीही म्हणेन की तो काय येडा बिडा होता की काय, की त्यांनी फक्त बारा दिवसात कंपनी सोडली. पण त्या काळामध्ये ॲपल सुद्धा त्या अनेक कंपनींपैकी होती जी कोणाच्यातरी तळघरात किंवा गॅरेजमध्ये सुरू झाली होती आणि एकदा व्यवसाय अपशित ठरल्यानंतर पुन्हा रोनाल्डला तेच दिवस पाहायचे नव्हते. दोन्ही पोरं तरुण होती त्यामुळे त्यांच्याकडे गमवण्यासारखं असं काही नव्हतं आणि भागीदारी करारामध्ये एक मुद्दा असा होता की
“ जर या तिघांपैकी कोणीही कर्ज घेतले असेल तर भागीदार म्हणून इतर दोघांची ते कर्ज फेडायचे जबाबदारी असेल आणि रोनाल्डला तो एक जुगार वाटला कंपनीने ॲपल-१ बनवण्यासाठी काही कर्ज घेतले होते आणि जे सुरुवातीचे 50 कम्प्युटर बाईट शॉप ला विकले होते ती जरा आर्थिक व्यवहारात ढिली होती.”
त्यामुळे रोनाल्ड भाऊला आलं टेन्शन की जर काही गडबड झाली तर आपल्या गुंतवणुकीतून हे कर्जाचे पैसे फेडायला लागतील. आणि एकदा प्लॉट मशीनच्या व्यवसायातून त्याला त्याची पूर्ण गुंतवणूक मोडून लोकांचे पैसे द्यायला लागल्याचा अनुभव होता. त्यामुळे त्याला ती रिस्क परत घ्यायची नव्हती. त्याला वाटलं यामध्ये रिस्क आहेच पण मला त्यामध्ये स्वतःच काही करायला भेटणार नाही आणि मी फक्त डॉक्युमेंट्स बनवत राहीन आपला जॉबच बरा आणि आपण आपला छंद जोपासावा त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन टाकला.
एप्पल सोडण्याचा त्याचा निर्णय कदाचित इतिहासातील सर्वात चुकीच्या निर्णयापैकी एक असेल कारण जर त्याने एप्पल सोडले नसते तर त्याच्या दहा टक्के भागीदारी चा आजचा हिशोब लावला तर अंदाजे 229 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1,90,45,68,95,50,000 एवढे भारतीय रुपये झाले असते.
नवनवीन update साठी :: Click Here
Apple सोडल्यानंतरच जीवन.
एप्पल सोडल्यानंतरही तो 1978 पर्यंत अटारी ह्या गेम बनवल्या कंपनीमध्ये काम करत होता नंतर त्याने दोन-तीन ठिकाणी जॉब केले .त्यानंतर त्याने आपला छंद जोपासण्याचे ठरवलं त्यांनी एक जुनी नाणी आणि पोस्टची तिकिटे खरेदी करणारा दुकान टाकलं सुरुवातीला ते चांगलं चाललं पण नंतर होणाऱ्या तोटे मुळे त्याला ते बंद करावा लागलं. त्यानंतरच्या काळामध्ये एका चोरीमध्ये त्याने जीवनभर कमावलेले सर्व पैसे गमावले त्यानंतर तो फ्लोरिडा मध्ये स्थायिक झाला.चोरीमध्ये पैसा गमावल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी दुर्दैवाने त्याला राहता घरीही विकावं लागलं.
2010 च्या दरम्यान त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं “Adventures of an apple founder”.
एप्पल मधून बाहेर पडल्यानंतरही रोनाल्ड दोन्ही स्टिव्हच्या संपर्कात होता, आणि ते दोघेही नेहमी अत्यंत आदराने रोनाल्ड बद्दल बोलत असे.
त्याने हे हि वाचा : टेस्ला कर ची निर्मिती करणारे खरे संस्थापक
रोनाल्ड ला एप्पल सोडण्याच्या आपल्या निर्णयावर कधीही पश्चाताप वाटला नाही कारण तो म्हणतो,
एप्पल यशस्वी होईल ह्याची मला खात्री वाटत होती. पण त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मी तो निर्णय घेतला होता आणि मी जर एप्पल मध्ये असतो तर मी कोणत्यातरी एका बिल्डिंगमध्ये डॉक्युमेंटेशन करत बसलो असतो आणि मला माझं भविष्य असं नको होतं.
“You have story of my life” -Ronal wayne