botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
HomeAutomobileBharat NCAP Vs Global NCAP || कशी केली जाते कारची क्रॅश...

Bharat NCAP Vs Global NCAP || कशी केली जाते कारची क्रॅश टेस्ट?, जाणून घ्या काय आहे Bharat NCAP.

Bharat NCAP Vs Global NCAP :: आजकाल आपली गाडी घेताना लोक गाडी किती सुरक्षित आहे याचा सेफ्टीरेटिंग सुद्धा तेवढेच काळजीपूर्वक पाहायला लागले आहेत सेफ्टी रेटिंग म्हणजे जर का गाडीचा अपघात झाला तर आत बसलेल्या प्रवासी किती सुरक्षित राहतील हे रेटिंग. फाईव्ह स्टार हे सर्वात जास्त रेटिंग असते आणि टाटाच्या हॅरियर(Tata Harrier) आणि सफारी(TATA Safari) या दोन अशा पहिल्या गाड्या असतील ज्यांना Bharat NCAP 5 star रेटिंग मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हे Bharat NCAP आणि काय फरक आहे Bharat NCAP Vs Global NCAP मध्ये ….

Bharat NCAP म्हणजे काय?

आता भारत सरकारने भारताचे स्वतःचे असे कार क्रॅश टेस्ट आणले आहे त्याचं नाव आहे Bharat NCAP.(Bharat New Car Assessment Program) हे 15 डिसेंबर  2023 पासून लागू झाले आहे. सुरक्षिततेबाबत कायम आग्रही असणारे रस्ते व पर्यावरण मंत्री श्री नितीन गडकरी यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. ही टेस्ट भारतात ज्या गाड्या बनतात किंवा भारतात इम्पोर्ट केल्या जातात त्यांना या टेस्ट कराव्या लागतात पण या टेस्ट करायला पाहिजे असं काही नियम नाही हे पूर्ण इच्छित असते.

पण मग प्रश्न पडतो की हे ऐच्छिक आहे मग का केल्या जातात ह्या टेस्ट, तर याचे उत्तर असे आहे की आहे की कोणत्याही शहाण्या माणसाला गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेच महत्त्व सांगण्याची गरज नसेल.

आजकाल लोक सुरक्षिततेबाबत थोडे जागरूक झालेत म्हणून आजकाल गाडी खरेदी करताना “कितना देती है” याबरोबरच किती स्टार आहेत असे विचारतात जेवढे जास्त स्टार तेवढी गाडी सुरक्षित असा अर्थ होतो. ह्या क्रॅश टेस्टमध्ये जेवढे जास्त स्टार तेवढी गाडी सुरक्षित. 5 Star मिळवले म्हणजे ती कार इतर कारच्या तुलनेत सर्वात सुरक्षित असा अर्थ होतो.

Bharat NCAP मुळे भारत हा जगातील पाचवा देश असा आहे की ज्याने असे कार क्रॅश टेस्ट सर्टिफिकेट आणले असेल याआधी अमेरिका, चीन, जपान, आणि दक्षिण कोरिया यांनी हे क्रॅश टेस्ट सर्टिफिकेट आणले होते. या नवीन देशी सर्टिफिकेट मुळे वाहन कंपन्या आता भारतातच अशा सेफ्टी टेस्ट घेऊ शकतात.

जागतिक कार क्रॅश टेस्ट म्हणजे Global NCAP(GNCAP) आणि Bharat NCAP(BNCAP) यामध्ये बरेचसे साम्य आहे पण Bharat NCAP हे भारताच्या रस्त्याची परिस्थिती आणि ड्रायव्हिंग कंडिशन यांना विचारात घेऊन बनवण्यात आले आहे.

Bharat NCAP Vs Global NCAP
Front Side Test

Global NCAP म्हणजे काय?

जगामध्ये गाड्यांची जी टेस्टिंग घेतली जाते आणि जी रेटिंग Global NCAP मी दिले जाते जे खूप खत खात्रीलायक मानले जाते हे टेस्टिंग खाजगी कंपन्या द्वारे घेतले जाते. पण Global NCAP मध्ये सगळ्याच गाड्यांचे टेस्टिंग केले जात नाही तर ठराविक गाड्यांचे टेस्टिंग केले जाते. आणि Adult Testing म्हणजे गाडीत बसलेली प्रौढ माणसे आणि Child Testing म्हणजे गाडीत बसलेली मुले यांना वेगवेगळे रेटिंग दिले जाते.

ग्लोबल NCAP मध्ये समोरच्या बाजूने जेव्हा टेस्ट होते ती 105 किलोमीटर या स्पीडवर घेतली जाते, त्याचबरोबर गाडीला एका बाजूने धडकावून पण टेस्ट घेतली जाते अशा प्रकारे वेगवेगळ्या टेस्टिंग करून त्या गाडीवर व गाडीतील प्रवाशावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करून त्या गाडीला रेटिंग दिले जाते.

ह्या टेस्ट कसा घेतल्या जातात?

गाडीची क्रश टेस्टिंग करण्यासाठी त्या गाडीमध्ये काही पुतळे बसवले जातात आणि त्यानंतर गाडीवर टेस्ट घेतल्या जातात व गाडी धडकवल्यानंतर आतील पुतळ्यांचे झालेली अवस्था यानुसार त्या गाडीला रेटिंग दिले जाते.

Bharat NCAP Vs Global NCAP
Side Impact Test

Bharat NCAP Vs Global NCAP

Global NCAP मध्ये प्रौढ प्रवाशांसाठी जर फाईव्ह स्टार रेटिंग पाहिजे असल्यास 34 पॉईंट्स ची आवश्यकता असते,
त्यामध्ये 16. समोरच्या बाजूच्या क्रॅशची टेस्टिंगसाठी, 16. साईटच्या बाजूच्या टेस्टिंगसाठी आणि दोन पॉईंट सीट वेल साठी असतात तर Bharat NCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग साठी कमीत कमी 27 पॉईंट प्रौढ प्रवाशांसाठी व 41पॉईंटस लहान प्रवाशांसाठी म्हणजेच लहान मुलांसाठी आवश्यक असतात जसं ग्लोबल एनकॅपमध्ये प्रौढांसाठी व बालकांसाठी वेगवेगळे सर्टिफिकेट दिले जाते तसे भारत एनकॅपमध्ये प्रौढांचे व बालकांचे एकत्र सर्टिफिकेट दिले जाते.

 

Bharat NCAP Vs Global NCAP क्रॅश टेस्ट चे प्रकार:

भारत एनकॅप या जवळजवळ ग्लोबल यांच्यासारख्याच आहेत ज्यामध्ये समोरच्या बाजूची टेस्ट नंतर गाडीच्या दोन्ही बाजूची टेस्ट आणि तिसरी म्हणजे पोल टेस्ट यामध्ये गाडीला एका उभ्या मोठ्या खांबाला धडकवले जाते. या तीन टेस्ट द्वारे गाडीचा अपघात झाल्यावर आपल्या प्रवाशांना किती इजा किंवा धोका असू शकतो याची चाचणी घेतली जाते.

Bharat NCAP Vs Global NCAP
Pole Test

 

भारत NCAP या सर्व टेस्ट आहेतच पण त्याचबरोबर गाडीमध्ये सहा एअर बॅग असणे आवश्यक आहे गाडीमध्ये ,इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल(Electronic stability control) आणि गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सीट बेल्ट असणे कंपल्सरी आहे

भारत एनकॅप मध्ये समोरच्या बाजूची जी घेतली जाते त्यामध्ये गाडीचा स्पीड हा 103 किलोमीटर प्रति तास असतो त्याचबरोबर साईट क्रॅश टेस्ट साठी हा स्पीड 80 किलोमीटर असतो तर पोल टेस्टसाठी हा स्पीड 29 किलोमीटर प्रतितास असतो.

click here

नवनवीन update साठी :: Click Here

कोण कोणत्या गाड्यांची टेस्ट घेतली जाते?

भारत एनकॅप हे पेट्रोल डिझेल बरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्या यांच्यावर सुद्धा ह्या टेस्टिंग घेतल्या जातात त्याचबरोबर ज्या गाड्यांची प्रवासी क्षमता हाट आहे अशा गाड्यांची सुद्धा टेस्टिंग घेतली जाते.

सध्या जर ग्लोबल एनकॅप साठी गाडीची टेस्टिंग करायची असेल तर साधारणपणे हा खर्च अडीच ते तीन कोटीच्या घरात येतो पण जर तेच टेस्टिंग भारत एनकॅप मध्ये करायचं असेल तर हा खर्च फक्त साठ लाख रुपये एवढाच येतो आणि या कमी खर्चामुळे जास्तीत जास्त कंपन्या आपल्या गाड्यांची टेस्टिंग करून घेतील अशी सरकारला आशा आहे.

हे ही वाचा :: इतिहास दाढी करणाऱ्या जिलेट रेझरचा

भारत एनकॅप(BNCAP) मुळे काय साध्य केले जाईल?

भारत एनकॅप चा परिणाम असा होईल की, आजकाल लोक सुरक्षित कारला प्राधान्य देत आहेत ,ह्या गोष्टीमुळे कंपन्यांना ग्राहकासाठी सुरक्षित कार देण्यास प्रोत्साहन मिळेल. आजच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा तिसरा कार मार्केट आहे. ह्या BNCAP सर्टिफिकेट मुळे गाडी मायलेज किती देते याबरोबरच किती सुरक्षित आहे ह्या गोष्टीस ही प्राधान्य मिळेल. सुरक्षित असल्यामुळे गाड्यांची निर्यात वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत कंपन्या सुरक्षितेचा विचार न करता जास्त मायलेज देणारी गाडी असेल यावर भर द्यायच्या पण आता BNCAP मुळे भारतीय गाड्या सुद्धा सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या असतील.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments