जगाच्या एकूण वाहनांच्या संख्येच्या १ % संख्या ही भारतातील वाहनांची आहे पण जगातील एकूण वाहन अपघाताची संख्या पहिली तर तो तब्बल १० टक्के आहे, त्यामुळे सुरक्षेततेच्या दृष्टीने महत्वाची असणारी ADAS Technology आजच्या वाहनांमध्ये प्रामुख्याने खरेदी करताना पाहणं आवश्यक आहे. आपण गाड्यांच्या जाहिरातीत किंवा सोशल मीडिया वर पहिला असेलच कि गाडी रस्त्यावरून चाललीये आणि ड्राईव्हर मस्त पैकी काहीतरी खातोय किंवा सर्व मित्र गाडीत पत्त्या खेळतायत आणि गाडी एकदम व्यवथित आहे त्या लेन मध्ये चाललीये. तर ही सर्व कमाल आहे ADAS Technology ची ज्याच्या मदतीने हे सर्व घडतंय.
चला तर मंग जाणून घेऊया काय आहे ही ADAS Technology, ADAS Technology meaning , ADAS Technology In cars म्हणजे काय ,ह्या ADAS Technology चे वेगवेगळे लेव्हल्स (ADAS Technology Levels) आणि मराठीत जाणून घेऊयात ही टेकनॉलॉजि कशी काम करते(ADAS Technology in marathi)
ADAS Technology म्हणजे काय ?(ADAS Technology in marathi)
ADAS Technology meaning
ADAS Technology किंवा ADAS System म्हणजे Advanced driver-assistance systems हे तंत्रज्ञान वाहनांना अधिक सुरक्षित बनवते आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे.यामध्ये गाडीच्या सगळ्या बाजूंनी सेन्सर्स असतात ते गाडीच्या भोवताली असणाऱ्या गोष्टी जसं की कोणी व्यक्ती दुसरी गाडी किंवा भिंत किंवा कोणतीही तर अडथळा याची माहिती ड्रायव्हरला देत राहते.
ADAS Technology मध्ये काही प्रमुख गोष्टी असतात ज्याच्यावरून गाडीचे नियंत्रण ठेवलं जातं जसं की रडार(Radar), लीडार (LiDAR),अल्ट्रासोनिक सेंसर(Ultrasonic sensors) आणि कॅमेरा या चार प्रमुख गोष्टींद्वारे आजूबाजूची माहिती घेतली जाऊन गाडीपर्यंत पोहोचवली जाते म्हणजे आपण याला गाडीचे कान,नाक आणि डोळे म्हणू शकतो आणि या चार गोष्टींद्वारे गाडीच्या आजूबाजूची माहिती सतत गोळा केली जाते.
जरा खोलामध्ये जाऊन बघूयात की ह्या चार गोष्टी कशा काम करतात.
ADAS Technology in cars
- रडार: ADAS Technology मध्ये गाडीच्या सर्व बाजूंनी हे रडार बसवलेले असतात. निघणाऱ्या रेडिओ लहरीद्वारे सतत डेटा गोळा केला जातो आणि ह्या लहरी गाड्यांच्या भोवतालच्या वस्तूंची माहिती गोळा करते . हिरडार वाहनांच्या मार्गा तील इतर वाहने, वस्तू व त्याचे आपल्या वाहनांपासूनचे अंतर व इतर वाहनांचा वेग मोजण्यास मदत करतात.
- लीडार (Light Detection and Ranging –LiDAR) : हे मानवी डोळ्यांना सुरक्षित असणाऱ्या किरणांद्वारे आपल्या अजून आजूबाजूचा 3D नकाशा तयार करते. याद्वारे सोडलेली किरणे किंवा इंग्रजीमध्ये आपण याला लाईट व्हेव्ज म्हणतो, ह्या लाईट व्हेव्ज त्याच्या मार्गात येणारे अडथळे जसे की इतर वाहने, माणूस किंवा इतर कोणतीही वस्तू यावर आधारून परत या लीडर सेंसर कडे येतात. यावरून ते सेन्सर लाईट व्हेव्हला परत सेन्सर कडे यायला लागलेला वेळ यावरून त्या वस्तूचे गाडी पासूनचे अंतर मोजते. ही प्रोसेस एका सेकंदामध्ये जवळजवळ दहा लाख वेळा होते आणि या डेटावरून भोवतालचा थ्रीडी मॅप तयार केला जातो.
- अल्ट्रासोनिक सेंसर :या अल्ट्रासोनिक सेंसरद्वारे ध्वनी लहरींचा उपयोग करून वाहनाजवळ असणाऱ्या वस्तूंचे अंतर मोजण्यासाठी केला जातो,याद्वारे चालकाला जवळच्या अडथळ्याची माहिती दिली जाते. या तंत्रज्ञानाचा उपयोग पार्किंग असिस्टंट(parking assist system) मध्ये केला जातो.
- कॅमेरा :वाहनावर बसवलेले कॅमेरे हे वाहन चालत असलेले आजूबाजूचे ट्राफिक, वाहतूक नियमाची चिन्हे,इतर वाहने आणि पदाचारी याची माहिती दृश्य स्वरूपात गोळा करते.
या चार प्रमुख उपकरणाद्वारे मिळालेली माहिती एका कंट्रोल युनिट कडे जाते त्या कंट्रोल युनिट मधील अल्गोरिदम द्वारे संभाव्य धोक्यांची शक्यता जाणून त्या हिशोबाने कृती केली जाते. जसे की चालकाला डुलकी लागली तरी गाडी जात असलेल्या लेनमध्येच ठेवणे , सिग्नल ला आला असेल तर वाहन थांबवणे किंवा अनपेक्षित पणे कोणतेही इतर वाहन समोर आले तर गाडीचे ब्रेक आपोआप लागणे इत्यादी.
ह्या कंट्रोल युनिट कडे मिळणाऱ्या माहितीद्वारे पुढील निर्णय घेण्यासाठी या ADAS Technology ची विभागणी ही पाच लेवल मध्ये केलेली असते.
नवनवीन update साठी :: Click Here
चला तर मग विस्ताराने पाहूयात काय असतात या ADAS Technology मध्ये लेव्हल्स.
ADAS Technology levels
1.Level-0
यामध्ये वाहनांचं पूर्ण नियंत्रण हे ड्रायव्हर कडे असते जसं की आपल्या पारंपारिक गाड्यांमध्ये असते,आणि एडस टेक्नॉलॉजी यात शून्य टक्के वापर केला जातो.
2. Level -1(Driver Assistance )
या लेवल मध्ये ADAS Technology कमी प्रमाणात वापरली जाते आणि अत्यावश्यक ते सहाय्य चालकाला केले जाते जसे की समोरच्या गाडीचा वेग किती आहे त्यावरून आपले गाडीचा वेग नियंत्रित करणे आणि समोरील गाडी पासून सुरक्षित अंतर ठेवणे. त्याचबरोबर पार्किंग असिस्टंट मध्ये गाडीच्या भोवतालचा ३६० अंशातील नकाशा चालकाला स्क्रीनवर दाखवला जातो, त्यानुसार चालकाला गाडी पार्क करण्यास मदत होते. याबरोबरच गाडी ज्यावेळेस रस्त्यावर लेनमध्ये चालत असते तेव्हा गाडीवर बसवलेले कॅमेरे लेनची मार्किंग बघून जर गाडी लेनच्या बाहेर जात असेल तर चालकाला यांची वॉर्निंग देऊन गाडी त्या लेन मध्ये ठेवण्यास मदत केली जाते. रस्त्याच्या कडेला असणारी वाहतुकीची चिन्हे जसं वेग मर्यादा उतार इत्यादीची माहिती ही चालत आला दिली जाते.
3. Level -2 (Partial Assistance )
ह्या लेवलमध्ये गाडी एका लेन मध्ये राहण्यासाठी मदत, त्याचबरोबर ट्रॅफिक मध्ये गाडीचं नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती गाडीचे ब्रेक लावणे याचा समावेश होतो. यामध्ये हे निर्णय जरी गाडी घेत असली तरीही चालकाला आवश्यक असेल तिथे गाडीचे नियंत्रण घेणे आवश्यक असू शकते. Lane keeping assist :- लेन कीपिंग असिस्ट मध्ये गाडी आपोआप एका लेन मध्ये ठेवली जाते, जर का गाडी यांच्या बाहेर जात असेल तर गाडीची स्टेरिंग आपोआप फिरून गाडी आहे त्या लेनमध्ये ठेवली जाते.
Traffic jam assist: गाडीचा वेग, गाडी चालते ती लेन व गाडीचे ब्रेक आपोआप नियंत्रित केले जातात, ज्याद्वारे समोरील गाडी पासून आपल्या गाडीचे अंतर व वेग सुरक्षित ठेवला जातो आणि गाडी त्याच लेनमध्ये ठेवली जाते. आपत्कालीन ब्रेकिंग(Automatic Emergency Breaking ): यामध्ये गाडीचे कॅमेरे व रडारचा उपयोग करून चालत्या गाडीसमोर येणारे अडथळे जसं की दुसरे वाहन, पदाचारी किंवा इतर अडथळा याची माहिती चालकाला दिली जाते. जर चालकाने स्वतःकाही कृती केली नाही तर अतिशय वेगाने निर्णय घेऊन गाडी आपोआप थांबते आणि होणारा अपघात टाळला जातो.
4. Level -3(Conditional Automation )
यामध्ये गाडी चालकाची काही कामे काही ठराविक कंडिशन मध्ये पूर्ण करते पण गाडीकडून नियंत्रण घेण्याची विनंती करण्यात चालकाला पुढील नियंत्रणासाठी तयार असावे लागते. या लेवलमध्ये लेवल एक व लेवल दोन सहित ट्रॅफीक जॅम पायलट (Traffic Jam Pilot ) आणि हायवे पायलट (Highway Pilot) यांचा समावेश होतो. ट्रॅफिक जाम पायलटमध्ये गाडी ट्रॅफिक मधून जात असताना सर्व निर्णय सिस्टीम घेते जसे की गाडीचा वेग, समोरील गाडी पासूनचे अंतर आणि जर शेजारील लेन मोकळी असेल तर गाडी इतर गोष्टींचा अंदाज घेऊन आपोआप तिची लेन बदलते. हायवे पायलट मोडमध्ये गाडी सर्व निर्णय घेते फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये ठराविक काळामध्ये चालकाने निर्णय घेण्याची विनंती करते उदा. सिग्नल समोरून जात असताना आजूबाजूने एखादे वाहन सिग्नल तोडून आल्यास गाडी चालकाला एका ठराविक वेळेत निर्णय घेण्याची संधी देते.
5 Level -4(High Automation)
या लेवल मध्ये गाडी ADAS Technology द्वारे सर्व निर्णय स्वतः घेते, गाडीमध्ये ड्रायव्हर नसला तरीही किंवा झोपला तरीही. यामध्ये ठरलेल्या मार्गावर गाडी स्वतः चालते आणि लेन पाळणे लेन बदलणे वळण घेणे सिग्नल पाळणे आणि पार्किंग साठी जागा शोधणे ही सर्व कामे गाडी स्वतः करते त्याच बरोबर पार्किंग साठी जागा शोधून चालकाच्या कोणत्याही मदतीशिवाय गाडी स्वतःहून पार्क केली जाते.
6. Level -5(Full Automation)
लेवल पाच हा सर्वात उच्च स्तर आहे. यामध्ये गाडी सर्व निर्णय स्वतः घेते यामध्ये स्टेरिंग, ब्रेक किंवा एक्सेलरेटर नियंत्रण पूर्ण ऐच्छिक असते. या लेवल मध्ये ड्रायव्हरची कोणतीही आवश्यकता नसते आणि गाडी स्वतःची निर्णय स्वतः तेही कोणत्याही परिस्थितीत घेते. गाडीमध्ये असलेली कम्प्युटर सिस्टीम मिळणाऱ्या माहितीनुसार निर्णय घेण्यात जबाबदार असते या लेवलमध्ये सर्व निर्णय जसे की ट्रॅफिकची परिस्थिती,वेगवेगळे वातावरण जसं पाऊस, बर्फवृष्टी किंवा अनपेक्षित वाहन, माणूस किंवा अडथळा यावर निर्णय घेऊन गाडी चालत राहते.
हेही वाचा :: Bharat NCAP Vs Global NCAP
येणाऱ्या काळात जसं जसं तंत्रज्ञान विकसित होईल तसं तसं यात अजून नवीन गोष्टीचा समावेश होईलच पण शेवटी हे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये चालकाने कायम अलर्ट असल्यास पाहिजे कारण अपवादाचा परिस्थितीमध्ये हे फेल होऊ शकतं.