नमस्कार मित्रांनो, गेल्या एक-दोन दिवसांपासून या ई-सिम (eSIM)आणि airtel eSIM खूप चर्चा होत आहे, Airtel कंपनीचे CEO गोपाल विठ्ठल म्हणले की लोकांनी ई-सिम (airtel eSIM)चा जास्तीत जास्त वापर केला पाहिजेल. eSIM म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे प्लास्टिकचे सिमकार्ड असते त्याऐवजी एम्बेडेड सिमकार्ड असते.त्याबद्दल समजून घेऊ, ते काय आहे, ते कसे कार्य करते, त्याचे फायदे काय आहेत आणि काही तोटे आहेत का.
कंपनी का म्हणतेय airtel eSIM वापरा ?
एअरटेलचे प्रमुख एचडी गोपाल विठ्ठल यांनी ग्राहकांना ई-सिम वापरण्याचा सल्ला दिला आहे . गोपाल विठ्ठल म्हणाले “आपल्या देशाने शक्य तितक्या लवकर फिजिकल सिम कार्ड च्या ऐवजी esim वापरायला सुरुवात केली पाहिजेल”. एअरटेल कडून सर्व ग्राहकांना मेल पाठवला गेला आहे आणि येथे त्यांनी airtel eSIM चे फायदे विशेषत: सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने जे फायदे आहेत ते ग्राहकांना सांगितले आहेत. गोपाल विठ्ठल यांचा मते ई-सिम कनेक्ट करणे खूप सोपे आहे आणि येथे जेव्हा तुम्हाला तुमचे डिव्हाइस बदलायचे असेल तरीही सहजतेने हे केले जाऊ शकते.
सिम कार्ड म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (subscriber identity module (SIM)). सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक मायक्रोचिप असलेले स्मार्ट कार्ड आहे, पूर्वी हे खूप मोठे असे नंतर हळूहळू मायक्रो सिम आले आणि मग आजकाल तुम्ही पाहिले असेल की जवळपास प्रत्येक फोनमधील नॅनो सिम सारखेच दिसते, त्यामुळे हे एक प्रकारचे स्मार्ट कार्ड आहे असं म्हणू ज्यामध्ये मायक्रोचिप असते. हे सिम मोबाईल मधून सहजतेने काढलं किंवा टाकलं जाऊ शकते.
eSIM म्हणजे एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्युल. नावावरून समजू शकते कि एम्बेडेड म्हणजे एखाद्या गोष्टीत एम्बेड केलेले असण्याचा अर्थ असा आहे की हे सिम तुमच्या मोबाइल फोनमध्ये आधीच एम्बेड केलेले असते. मंग आता मनामध्ये एक प्रश्न येतो की मी मोबाईल फोन विकत घेत असताना मला ते सिम मिळेल, आणि ते आधीच चालू असेल का, त्याचा नेटवर्क कोणता असेल , तर ह्याचा उत्तर नाही असा आहे. ते तुमच्या मोबाइलला मध्ये असेल पण बंद स्थितीत असेल तुम्हाला ते चालू करावा लागेल.
हे ई-सिम म्हणजे मायक्रोचिप तुमच्या स्मार्टफोनमध्ये आधीच एम्बेड केलेली असेल आणि आपल्या मर्जीनुसार आपण कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क जसे कि Airtel असो किंवा Jio, ते आपण चालू करू शकतो , तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा बदलण्याची गरज नाही. म्हणजे सोप्प्या भाषेत सांगायचं झाला आजच्या सारखा आपल्याला ते प्लास्टिक चे सिम घ्यायची गरज नाही सारखा मोबाइलमध्ये टाकायची किंवा काढायची गरज नाही , म्हणजे हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. म्हणजे फिजिकल सिम म्हणजे काय, तुमची सर्व माहिती त्यात सापडते, पण हे ई-सिम काय आहे? तर ते आधीच उपकरणाच्या आत आहे आणि ही एक प्रकारची डिजिटल कॉपी आहे,
eSIM फक्त मोबाईलच नाहीतर ते स्मार्ट वॉच आणि भविष्यात ते लॅपटॉप मध्ये देखील असू शकेन , हे ई-सिम कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये वापरले जाऊ शकते, आणि ह्याद्वारे नेटवर्कशी कायमस्वरूपी कनेक्ट केले जाऊ शकते आणि येथे आपल्याला कोणत्याही फिजिकल सिमची गरज नाही कारण ई-सिम हे एक डिजिटल सिम आहे,
ई-सिम चे काही प्रमुख फायदा
- फिजिकल सिम घेण्याची गरज नाही, जेव्हाही सिमकार्ड बदलायचे असेल तर काढण्याची गरज नाही.
- सिम हरवण्याची भीती नाही, टेन्शन नाही कारण हे आपल्या स्मार्टफोन मधेच फिट केलेले असते.
- यासोबत,सर्वात महत्वाची गोष्ट जी समोर येते ती म्हणजे आजची डिजिटल जीवनशैली आहे, सर्व काही डिजिटलशी जोडलेले आहे, मोबाईल, टॅबलेट,घड्याळे आहेत,
- त्यामुळे या सर्व गोष्टी सिम सोबत सहजतेने जोडल्या जाऊ शकतात, ते ही कोणत्याही अडचणी शिवाय.म्हणजेच स्मार्टफोन्स आणि टॅब्लेटमध्ये सिम कार्ड एम्बेड केले असेल.
- त्याचा फायदा असा आहे की आपण डिजिटल उपकरणे एकमेकांसोबत जोडू शकतो.
- esim च्या तुलनेत साधे सिम हे हॅक करणे सोप्पे आहे पण या esim ला हॅक करणं अवघड आहे
कल्पना करा कि तुम्ही तुमचे स्मार्ट वॉच घातले आहे आणि हे सहजतेने आपल्या मोबाइलला कनेक्ट करता येते. आपण त्यावर किती पायऱ्या चढलो किंवा उतरलो ते मोजू शकतो,तुम्ही किती किलोमीटर चाललात, या सगळ्या गोष्टीची माहिती हे स्मार्ट वॉच देते. पण समजा तुम्हाला दूर कुठेतरी जायचे असेल किंवा तुम्ही फोन घरी विसरला तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या स्मार्ट वॉच वर कॉल घेऊ शकत नाही कारण स्मार्ट वॉचबरोबरच तो फोनही तुमच्याकडे असायला हवा. पण जर ह्या स्मार्ट वॉच मध्ये esim असेल तर ते एकमेकांशी जोडलेले राहतील, तर तुम्ही त्याच्याशी आरामात कनेक्ट व्हाल तर सहजतेने मोबाईल जवळ नसला तरी आपण स्मार्ट वॉच वरती कॉल घेऊ शकतो जर तुम्ही दूर कुठेतरी गेला असाल तरीही.
यासोबत, इथे आणखी एक गोष्ट आहे म्हणजे आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक फोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा असते, जेव्हा तुम्ही त्यात दोन सिम टाकता तेव्हा तुम्ही फिजिकल सिम वापरू शकता . पण ई-सिम चा अजून एक फायदा असा आहे कि एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर देखील आपण वापरू शकतो. जर आपल्याकडे साधे सिम असेल तर आपण एकच नंबर त्यावर वापरू शकतो. पण ई-सिम बाबतीत तुमचा स्मार्टफोन कोणता आहे, तो किती परवानगी देतो, त्यानुसार, तुम्ही एकाच स्मार्टफोनवरून अनेक मोबाइल नंबर वापरू शकाल. यासोबतच, आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे ई-सिम एन्क्रिप्शन टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे हॅकिंग वगैरे शक्य नाही(airtel eSIM)
पण यात सर्वात महत्त्वाचा फायदा जो सांगितला जात आहे तो म्हणजे जर आपला मोबाईल चोरीला गेला तरी तो सापडणे सोप्पे आहे. कारण चोर पहिल्यांदा त्यातील सिम कार्ड काढून मोबाईल बंद करतात, पण ई-सिम च्या बाबतीत ते मोबाईल मधून काढता येत नाही कारण ते एम्बेडेड असते त्यामुळे मोबाईल चोरीला गेला तरी आपला नंबर चालूच असतो. आणि जर चोराने विचार केला कि ह्यातील ई-सिम बदलू तर ते त्याला शक्य नाही कारण त्यासाठी काही जे काही मार्ग आहेत ते त्याला शक्य नसेल त्यामुळे चोरीला गेला तरी स्मार्टफोन ट्रॅक करणे सोपे होईल आणि चोरणार्यांसाठी ह्याचा वापर करणे अवघड असेल.त्यामुळे त्याचे बरेच फायदे होऊ शकतात(airtel eSIM).
ई-सिम चे काही तोटे
काही लोकांना सारखे मोबाईल बदलायची सवय असते, आला नवीन मॉडेल कि घे नवीन फोन, किंवा १-२ वर्ष झाले कि घे फोन अशा लोकांना ह्याचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतोआजकाल जस तुम्हाला तुमचा मोबाईल बदलायचा असेल तर तुम्ही तुमच्या पहिल्या मोबाईलमधले सिम काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकता, पण यात काय आहे ह्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हशन ची जी प्रोसेस आहे ती थोडीशी अवघड म्हणा किंवा गुंतागुंतीची म्हणा ती तेवढी साध्या सिम सारखी सोप्पी नाहीये .
त्यासाठी काही एसएमएस नेटवर्क कंपनी जसे Jio किंवा Airtel(airtel eSIM) ह्यांना पाठवावा लागतो. त्याचबरोबर त्यामोबईल चा IMEI, EID नंबर माहित असावा लागतो. त्यानंतर तुमच्या ई-मेल वरती एक QR कोड येतो, तो QR कोड स्कॅन करावा लागतो अशी ही थोडी गुंतागुंतीची प्रोसेस आहे(airtel eSIM) .ही प्रोसेस तेवढी सोप्पी नाहीये जसा कि एका मोबईल मधून काढले आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकले .
अशाच मनोरंजक माहितीसाठी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा : Click Here
पण ह्याचे तोट्या पेक्षा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फायदे जास्त आहेत.
आज भारतात जवळपास प्रत्येक टेलिकॉम कंपनी ई-सिम पुरवते. पण आजही खूप थोड्या मोबईल मध्ये ई-सिम ची सुविधा उपलब्ध आहे.समजा Airtel eSIM देत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते कोणत्याही स्मार्टफोनवर वापरू शकता. त्यासाठी तो फोन ई-सिम ची सुविधा देत असला पाहिजेल. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये या esim सुविधा नसेल तर ते अजिबात चालणार नाही. हळूहळू स्मार्टफोनचे कंपनी हे esim येणाऱ्या आपल्या सगळ्या मॉडेल आणू लागल्या आहेत त्यामुळे ते अधिक वापरले जाईल.
ऍपल ने लेटेस्ट आयफोन 15 लॉन्च केला, तर अमेरिकेसाठी त्यांनी फक्त esim वर चालणारे एक मॉडेल लॉन्च केलंय आणि इतर देशांमध्ये esim आणि फिजिकल सिम दोन्हीची सुविधा देण्यात आली आहे, त्यामुळे हळूहळू esim असणारे मोबाईल वाढतील आणि जास्त लोक ह्याचा वापर करू शकतील.
बरं हे झाला ही ई-सिम वापरणाऱ्यांचा पण ह्यातून दूरसंचार कंपनीला काही फायदा होईल का? तर ह्याचा उत्तर आहे होय. नक्कीच दूरसंचार कंपनीला ह्याचा फायदा होईल आणि त्यांचा फिजिकल सिमचा खर्च वाचेल. फिजिकल सिम ग्राहकाला देण्यासाठी दूरसंचार कंपनीला ते बनवावे लागते किंवा कुणाकडून तरी विकत घ्यावे लागते, त्याचे डिस्ट्रिब्युटर नेमावे लागतात मंग ते दुकानात पोहचतात आणि आपल्याला मिळतात, तर ई-सिम मुळे ह्या सर्व सायकल ची काहीही गरज नाहीये त्यामुळे त्यांचे बरेच पैसे वाचतील.म्हणून airtel कंपनी म्हणतेय जर ग्राहकांनी airtel eSIM वापरावे कारण कंपनीचे खूप पैसे वाचतील
टेलिकॉम कंपनी सॉफ्टवेअर अपडेट देखील येथे पाठवू शकतात, म्हणजेच, जर कंपनीने तंत्रज्ञान विकसित केले फिजिकल सिम बदलण्याची गरज नाही फक्त सॉफ्टवेअर अपडेट करा.जसा कि ३G नेटवर्क होता आणि नवीन ४G आले होते , तेव्हा आपल्याला ४G वापरण्यासाठी सिम बदलावे लागले होते. पण ई-सिम मुळे आपल्याला हे करायची गरज नाही फक्त सॉफ्टवेअर अपडेट केले कि झाले काम ह्यात आपलाही फायदा आणि कंपनीचा ही(airtel eSIM).
#airtel eSIM #airtel eSIM