लग्न ठरलं मंडप सजला जेवण पण बनलं, निमंत्रण दिलेली सगळी वऱ्हाडी मंडळी पण आली ,वाजत गाजत लग्न पण लागलं आणि लग्न झाल्यावर समजलं की वऱ्हाडी मंडळी ज्या खोक्यात आपण आणलेल्या टाकतायेत ते खोकंच दुसऱ्या कुणाच तरी आहे ज्याचा या लग्नाची काहीही संबंध नाहीये. होय मंडळी असच काहीस झालंय काँग्रेसच्या Donate for Desh या अभियानचं…
काय आहे Donate for Desh(डोनेट फॉर देश)?
काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी व पक्ष उभारणीसाठी डोनेट फार देश हे अभियान जाहीर केलं होत, ज्याद्वारे लोकांकडून पैसे उभारून ते पैसे निवडणुकीसाठी त्याचा उपयोग करायचा जाहीर केलं होतं पण नंतर बातम्या यायला लागला की अभियानाचे जे डोमेन आहे ते भाजपाकडे आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की, डोमेन म्हणजे एखाद्या वेबसाईटचा पत्ता किंवा नाव जसा आपल्या वेबसाईटचा डोमिन आहे aaiknabhava.com. जर कोणी काँग्रेसच अभियान समजून donatefordesh.org ह्या डोमेन वरती गेलं तर ते आपल्याला घेऊन जात आहे भाजपाच्या एका क्राउड फंडिंग साईट वरती.
का सुरु केलं Donate for Desh?
काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी लोकांकडून 138 या संख्येमध्ये जसं की 138 रुपये, 1380 रुपये, 13800 रुपये अशा संख्यांमध्ये लोकांना दान करण्याचं आव्हान काँग्रेसने केलं होतं. काँग्रेसने योजनेचे नाव ठरवलं Donate for Desh (डोनेट फॉर देश), नाव जाहीरही केलं आणि या दरम्यान ते विसरून गेले की ज्या नावाने योजना सुरू केली आहे त्या नावाने डोमेन उपलब्ध आहे की नाही ,जर हे डोमेन असेल तर घ्यावं लागेल. पण गडबडीत योजना जाहीर केली आणि डोमेन कडे दुर्लक्ष केलं, योजना जाहीर केल्यानंतर लक्षात आलं की donatefordesh.org या वेबसाईट वरती गेल्यावरती तिथून दुसऱ्याच एका वेबसाईट वरती री डायरेक्ट केला जाते ती वेबसाईट आहे https://www.narendramodi.in/donation/ आणि या वेबसाईट वरती भाजपा द्वारे लोकांकडून पक्षासाठी निधी उभा केला जातोय.
आता भाजपाची आयटी सेल किती ॲक्टिव्ह असते याबद्दल वेगळे सांगायची गरज नाही आणि त्याचा अनुभव परत सगळ्यांना आला आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला तर नक्कीच आला.
donatefordesh.org हे डोमेन हातातून गेल्यावर त्यांनी donateinc.net हे डोमेन घेतलं, पण आता विषय असा आहे की योजनेचे नाव आहे Donate for Desh. योजना काँग्रेसची पण डोमेन भाजपाचं,आणि ह्या अभियानाचे नाव जे आहे ते काँग्रेसने घेतलेल्या डोमेन मध्ये कुठेच नाहीये .
काँग्रेसने हे अभियानाची घोषणा केली 16 डिसेंबर 2023 ला आणि इंटरनेट वरती जर जाऊन आपण चेक केलं तर आपल्याला दिसेल की 18 डिसेंबर 2023 ला donatefordesh.org हे डोमेन रजिस्टर झालंय.
काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत ह्यांनी ह्या गोष्टीवर “X ” म्हंटलं::
“आज लोकतंत्र को सबसे ज़्यादा ख़तरा बड़े पैसे का है ,जिस पैसे के प्रभाव में नीति और नियम क़ानून बन रहे हैं ,जिस पैसे के आधार पर चुनी हुई सरकारों और लोगों के मत के साथ खिलवाड़ होता है जिस पैसे के लिए औद्योगिक जगत पर दबाव बनाया जाता है एक ही पार्टी की फंडिंग का इसीलिए वक़्त आ गया है कि जनता ही इसका समाधान करे , Donate for Desh एक पहल है, जहां आपका छोटा सा योगदान इस देश के लोकतंत्र को सुरक्षित रखेगा, जनता के मुद्दों को लड़ने के लिए हमें संबल देगा.”
दरम्यान प्रत्युत्तर देताना अमित मालवीया जे की भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत ते म्हणाले “काँग्रेस च्या रडण्याकडे लक्ष नका देऊ, त्यांची फजिती झालीये, ह्यांना साधं डोमेन घेता येत नाही आणि हे देश चालवायला निघालेत”
नवनवीन update साठी :: Click Here
ह्या डोनेट फॉर देश अभियानासाठी पहिल्याच दिवशी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी “X” एक्स वरती घोषित केलं की पहिल्या दिवशी या माध्यमातून १ कोटी 17 लाख रुपये निधी जमा झाला आहे. पहिल्या दिवशी सर्वात जास्त निधी देणारा आपला महाराष्ट्र होता. महाराष्ट्र मधून पहिल्या दिवशी जवळपास 23 लाख रुपये जमा केले गेले होते.
हे ही वाचा :: धोनीची 8 वैशिष्ट्ये ज्यामुळे आहे तो इतरांपेक्षा वेगळा.
donatefordesh.org हे तर भाजपाकडे आहे
जेव्हा हा डोमेनचा घोळ लक्षात आला तेव्हा मग काँग्रेस कडून सांगण्यात सुरुवात झाली की या अभियानाचे डोमेन वेगळा आहे आणि भाजपाने या आमच्या अभियानाची कॉपी केली आहे आणि मग सुरू होतो आरोप प्रत्यारोप, मग सगळ्यांसमोर यायला लागलं की काँग्रेसची आयटी टीम भाजपाच्या तुलनेत मैदानात खूपच मागे आहे. काँग्रेसकडून सांगायला सुरुवात झाली की जे donatefordesh.org आहे ते आमचं नाही आणि काँग्रेसने या अभियानासाठी जे डोमेन घेतला आहे ते लोकांपर्यंत पोचवायला पक्षाने सुरुवात केली.या अभियानाद्वारे काँग्रेसचा लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे आणि काँग्रेस म्हणते की पक्ष 2024 च्या निवडणुका जनतेच्या पैशाच्या भरोशावर लढणार आहे.