botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
Homeविज्ञानइतिहास दाढी करणाऱ्या जिलेट रेझरचा

इतिहास दाढी करणाऱ्या जिलेट रेझरचा

इतिहास दाढी करणाऱ्या जिलेट रेझरचा – “The Best a Man Can Get”

जिलेट एक   safety razors आणि personal care products चा अमेरिकन ब्रँड, जे  दाढी चे ब्लेड  शेविंग क्रीम असे  प्रॉडक्ट  आहे . आज जिलेट चे २७ पेक्षा जास्त देशात  कारखाने , २०० पेक्षा जास्त देशात हजारो  कोटी  डॉलर्स च्या  वॉर विक्री होते. ह्या  अवाढ्यव  साम्राज्याची गोष्ट  खूपच  रोचक आहे  चला तर  जाणून घेऊया काय आहे  जिलेट रेझरचा शोधाचा इतिहास. 

जिलेट ची सुरुवात  किंग कॅम्प जिलेट (१८५५-१९३२)याने १९०१ साली केली . किंग जिलेट चा जन्म विस्कॉन्सिन मध्ये १८५५ साली  झाला, वडील जॉर्जे वॉलकॉट जिलेट कधी पोस्टात तर कधी वृत्तपत्रकात संपादक तरी कधी दुसराच काम करी ह्या अश्याच कामाच्या शोधात हे कुटूंब आले शिकागोला आणि किंग च्या वडिलांनी तिथे एक हार्डवेअर चा दुकान टाकले.  ह्या दुकानातील कामात तरुण किंग जिलेट आपल्या बापाला हातभार लावी. दुर्दैवाने शिकागोला १८७१ ला लागलेल्या आगीत ह्यांचा दुकान जाळून राख झालं. मंग रोजीरोटी साठी किंगने  वेगवेगळ्या कंपन्यात सेल्समन च्या नोकऱ्या केल्या . 

न्यूयॉर्क मधील ‘क्राऊन कॉर्क अँड  सील’ हि अशीच एक कंपनी, हि कंपनी बाटल्यांना लागणारे झाकण तयार करीत असे.  तेव्हा किंग ने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एकदाच वापरून फेकून द्यायची ‘डिस्पोझेबल ‘ गोष्ट पहिली. ह्या दरम्यान किंग चे वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, जस की पाण्याचा व्हॉल्व्ह , लाईट ची केबल आणि त्याने ह्या गोष्टीच पेटंट ही  घेतले पण , एवढे प्रयत्न करून त्याला म्हणावं  तस लाभला नाही. अश्याच एका पाणी कार्बोनेट  करण्याच्या प्रयत्नात त्याने त्याकाळी जवळजवळ २५००० डॉलर वाया घालवले. ह्या अपयशाने किंग खूप दुखी झाला. वेगवेगळ्या गोष्टी शिकणारी, प्रयत्न करणारी माणसं कधी खचत नाहीत, ह्या सर्व  उपदयापात हा माणूस दुखी होता पण खचला मात्र नव्हता. 

Gillette_razor

जिलेट रेझरचा शोध ::

त्याकाळी दाढी करणं आजच्या एवढ नव्हता, असच एकदा दाढी करताना किंगला ला वाटले दाढी करणे ही  गोष्ट सोप्पी केली  तर.. ? आणि त्याला दाढीचे ब्लेड बनवण्याची कल्पना सुचली. कारखान्यात काम करताना त्याने एकदा वापरून फेकून द्यायची गोष्ट शिकला होता. मंग त्याने विचार केला असेच दाढीचे डिस्पोसेबल ब्लेड्स बनवले तर?.  किंगने ह्या गोष्टीचे पेटंट घेतलं. बरं  आता  साहेबानी पेटंट घेतलं खरं पण ही  कल्पना  प्रत्यक्षात उतरवणं    तेव्हडी सोप्पी गोष्ट नव्हती, ह्यात अनेक वर्ष गेली. हा तिढा कोणी सोडवला असेल तर तो किंग जिलेट चा सहकारी निकर्सनने.  निकर्सनने ब्लेड बनवणाऱ्या मशीनचं  डिझाइन  बनवलं आणि सप्टेंबर १९०१ साली किंग जिलेट आणि  निकर्सन यांनी भागीदारीत कंपनी सुरु केली. कंपनी सुरु झाली ब्लेडचे उत्पादन तर सुरु केले खरे पण पहिल्या वर्षी खपली फक्त १५०-२०० ब्लेड. धीर सोडेल तो व्यावसायिक कसला? पण पुढच्या २ वर्षांनी तब्बल ४ कोटी ब्लेड्स विकले. 

 एव्हाना किंग च्या लक्षात एक गोष्ट आली होती ती म्हणजे आपल्या मालाची विक्री वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या मालाची जाहिरात आणि ब्रॅण्डिंग करणं गरजेचं आहे.   किंगच्या मनामध्ये पक्कं होता की जिलेटची ऐवढी घट्ट ब्रँड इमेज पाहिजे की ब्लेड म्हंटलं कि फक्त जिलेटच.  १९१० साली एक वॅग्नर  नावाच्या बेसबॉल खेळाडूने जिलेट ची जाहिरात केली आणि तेव्हापासून खेळाडूंना आपल्या जाहिरातीत घेण्याची परंपरा आजगायत कायम आहे, अगदी रॉजर फेडरर ते सचिन तेंडुलकर ह्यांना आपण जिलेटच्या  जाहिरातीत   पाहिलंय. 

जिलेटची लोकप्रियता सातवे आसमान

ह्यादरम्यान पाहिलं महायुद्ध सुरु झालं होत. जिलेटने सैनिकांना ब्लेड पुरवली आणि जिलेटची लोकप्रियता सातवे आसमान पर  पोहचली. याच लोकप्रियतेच्या जोरावर यूरोपच मार्केट पण कंपनीने काबीज करायला सुरुवात केली.  जाहिरात, ब्रॅण्डिंग आणि ग्लोबल कंपनी ह्या त्रिसूत्री भर देऊन कंपनीने अफाट यश प्राप्त केले. जिलेटचे ब्लेड्स  म्हणजे मर्दानगीचे, सेक्सी असल्याचे लक्षण वगैरे ज्याचा खऱ्या आयुष्यात काहीच संबंध नाही अश्या गोष्टींचा भाडीमार करून जिलेटने आपली आपली एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आणि अल्पावधीतच १०० कोटीच्या वर विक्रीचा आकडा गाठला.  १९९१ साली फोर्ब्स ह्या जगप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर    झळकलेलं जिलेट रेझरचं  छायाचित्र खूपच अदभूत गोष्ट मानली गेली. जिलेटने बनवलेले ट्वीन ब्लेड (Twin Blade razor)  सिरीज खूप लोकप्रिय झाली, ह्याची मागणी येवढी वाढली कि त्या वाढत्या मागणीला तोंड देणं कंपनीला अवघड होऊन बसलं पण उत्पादनात वाढ करून जिलेटने पुन्हा बाजी मारली. 

 

जिलेटच्या वाढीत ट्रॅक २ (Trac 2) आणि सेन्सर  (Gillette sensor) ह्या दोन उत्पादनांनी खूप मोठा टप्पा गाठून दिला. ट्रॅक-२ हसाठी  दोन पात्यांचा अंतर किती असावं आणि हलत्या चेहऱ्यावर दाढी कशी जास्त चांगली होईल ह्या कल्पनेवर प्रचंड संशोधन कंपनीने केले  . 

 

२००५ साली प्रॅक्टर अँड गॅम्बल (P&G ) ने विकत घेतल्यामुळे जिलेट कंपनीचं वेगळं असं अस्तित्व राहिलं नाही, पण ब्रँडची लोकप्रियता लक्षात घेऊन आजही  P&G  जिलेट ट्रेडमार्क आपल्या उत्पादनावर वापरते कारण आजही दाढी म्हंटल कि जिलेटच हे समीकरण ग्राहकांच्या मनात दृढ करायला किंग जिलेट यशस्वी झाला होता.       

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments