botão whatsapp
5.7 C
New York
Tuesday, April 8, 2025

Buy now

“Jio Satellite Internet भारतीय दूरसंचारात नवीन क्रांतीचा शुभारंभ”

Table of Contents

JIO  भारतीय दूरसंचार क्षेत्रात  क्रांती  केल्यानंतर  आता कंपनी उपग्रहाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या  इंटरनेट(Jio satellite internet) क्षेत्रात उतरली आहे ,ह्यासाठी लागणारे परवानेही कंपनीने मिळवले आहेत आणि हि सेवा कशी असेल ह्याची एक झलक सुद्धा कंपनीने दाखवली आहे. चला तर मंग जाणून घेऊ काय आहे हि नवीन गोष्ट …. 

जिओ च्या प्रवेशाने देशाच्या दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली, JIO  येण्यापूर्वी १ GB डेटा साठी २५० ते ३०० रुपय  खर्च करावे लागत असे पण JIO  ने इंटरनेट  खूप स्वस्तात दिल्यामुळे दुसरसंचार कंपन्यांमध्ये  दर युद्ध भडकलं आणि अनेक कंपन्यांना आपला गाशा मार्केटमधून गुंडाळवा  लागला. आता, JIO  ने इंटरनेट पुरवणाऱ्या नवीन माध्यमामध्ये एन्ट्री केली आहे ते म्हणजे सॅटेलाईट इंटरनेट(satellite internet). नुकत्याच आलेल्या बातमीनुसार   दूरसंचार विभागाने(Department of Telecommunication)  जिओ ला ह्या  सेवेसाठी(GMPCS) लागणारे सर्व परवाने दिले आहेत.  आणि ह्याद्वारे JIO  ने प्रवेश केला आहे एलोन मस्कच्या  (Elon Musk)   जगावर मोनोपॉली असलेल्या सॅटेलाईट इंटरनेट क्षेत्रात. आता JIO  थेट स्पर्धा करेन  एलोन मस्कच्या  स्टेरलिंक(Starlink) ह्या कंपनीबरोबर. 

उपग्रह इंटरनेट

JIO  हि भारताची   सॅटेलाईट इंटरनेट सेवा देणारी पहिली कंपनी असेल.ह्या सेवेद्वारे JIO  भारतभर हायस्पीड  इंटरनेट देईन जे सध्याच्या केबल नेटवर्कद्वारे पोहचू शकत नाही. कंपनीने ने ह्या दुर्गम क्षेत्रातही  हायस्पीड इंटरनेट देणाऱ्या सेवेचा डेमो इंडियन मोबाईल  काँग्रेस   (India Mobile Congress)  मधे दिला.  स्पेस फायबर हि सॅटेलाईट बेस्ड गिगा फायबर सर्विस असे तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे अगदी दूरच्या आणि दुर्गम ठिकाणीही सहज सेवा पोहचवू शकते जिथे फायबर केबलद्वारे ब्रॉडबँड सेवा पोहचू शकत नाही.

“JIO ने दिलेल्या माहितीनुसार देशात चार ठिकाणी ह्या सेवेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि ही  गावे स्पेस फायबरद्वारे जोडली गेली आहेत. ह्यात गुजरात मधील गीर, छत्तीसगढ मधील कोरबा, ओडिसा मधील नवरंगपूर आणि आसाम मधील जोराट ह्या ४ ठिकाणांचा समावेश आहे.” 

Mukesh Ambani

JIO  स्पेस फायबर काय आहे आणि कसे काम करते ::

आता पर्यंत भारतात इंटरनेट सेवा केबल द्वारे जागोजागी पोहचवली जात असे ज्याला फायबर लाईन म्हणतात. पण JIO स्पेस असे तंत्रज्ञान आहे कि ज्याद्वारे सॅटेलाईट मधून थेट इंटरनेट पोहचवले जाईल ह्यासाठी कोणत्याही टॉवर किंवा वायरची गरज नसेल. हे तंत्रज्ञान सॅटेलाईट रिसिव्हर डिशद्वारे इंटरनेट ट्रान्समीट करण्यासाठी डिश चा उपयोग करते  जसे कि आपल्या TV  ला जोडलेली डिश आणि ह्याद्वारे १ GBPS  पर्यंत इंटरनेट स्पीड मिळू शकेन. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या घरावर एक डिश अँटेना बसवावा लागेल ज्याच्या माध्यमातून येणारे सिग्नल कॅप्चर केले जातील.  ने ही  सेवा देण्यासाठी लुक्सएमबर्ग (Luxembourg)  मधील SES  Global  ह्या कंपनी बरोबर भागीदारी केली आहे ,SES  Global  हि कंपनी जगभर  मेडीयम अर्थ ऑर्बिट सॅटेलाई   (Medium  Earth Orbit  satellite) ही  सेवा पुरवते .  

 

“JIO च्या म्हणण्यानुसार ह्या सेवेद्वारे देशातील सर्व ठिकाणी चांगल्या दर्जाचे इंटरनेट कंपनी पुरवू शकेन आणि येणाऱ्या काळात ह्याचा देशभर विस्तार केला जाईल. येणाऱ्या काळात ह्याद्वारे ४५ कोटी ग्राहकांना ह्याचा फायदा होईल. “

 

ह्याचा दर  काय  असेल ::

सध्या असा अंदाज आहे की ही  सेवा वायर आणि वायरलेस सेवेपेक्षा कमी दरात असेल. हे स्वस्त तर असेलच पण ह्याचा दर्जाही  उत्तम असेल आणि ह्यात १ GBPS पर्यंत इंटरनेट स्पीड भेटेल.JIO च्या म्हणण्यानुसार ही  सेवा किफायतशीर असेलह्याद्वारे त्या सर्व प्रदेशात पोहचता येईल ज्या ठिकाणी मोबाइल टॉवर आणि केबल लाईन पोहचवणे अशक्य आहे. 

 

जिओ ने ही सेवा सुरु करून satellite internet क्षेत्रात नवीन युद्ध सुरु केलंय आणि लवकरच airtel सुद्धा OneWeb नावाने ही सेवा सुरु करणार आहे. ह्या दरम्यानच एलोन मस्कची Starlink ही  सुद्धा बरेच दिवसापासून ह्या क्षेत्रात सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेच. ह्या स्पर्धेचा लाभ हा अंतिम ग्राहकाला होणार आहे कारण ह्या कंपन्यांमधील जास्त ग्राहक मिळवण्याच्या स्पर्धेत कमी दरात ही  सेवा देण्याची चढाओढ लागेल आणि ग्राहकाला कमी दरात हे सेवा मिळेल.   

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles