botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
HomeTechIndia's first own AI || Ola Krutrim Al || भारताचे पहिले AI...

India’s first own AI || Ola Krutrim Al || भारताचे पहिले AI टूल-“कृत्रिम”

India’s first own AI-Ola Krutrim Al(कृत्रिम).  OpenAI (chat GPT) चे CEO चे सॅम अल्टमन (Sam Altman) यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की भारत chat GPT सारखं काही बनवू शकेल का? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर भारतीय म्हणून आपणा सर्वाना आपमानास्पद असं होतं ते म्हणाले की भारताने याचा विचार देखील करू नये आणि आमच्याशी स्पर्धा करण्याचा नक्कीच करू नये कारण ते आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत.
कट टू 15 डिसेंबर 2023 ओला या एका भारतीय कंपनीने कृत्रिम या नावाने भारताचे पहिले Ola Krutrim Al लॉन्च केले आणि आता सॅम अल्टमन ह्यांना त्यांचा प्रश्नच उत्तर नक्कीच मिळालं असेल.

का आहे स्पर्धा ?

कोणत्याही देशाला सुपर पॉवर बनवायचे असेल तर त्या देशाची आर्थिक ,सामाजिक स्थिती आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी मध्ये प्रगती करत राहणे अशा गोष्टी खूप आवश्यक असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये OpenAI कंपनी ने ChatGPT हे Artificial Intelligence वर काम करणारे टूल मार्केटमध्ये आणले नंतर गुगलने सुद्धा आपले बार्ड ,जेमिनी AI टूल आणले त्यानंतर वेगळं देशांनी त्यांच्याकडून AI टूल आणण्याचा प्रयत्न केला पण ह्या शर्यतीमध्ये भारत हा काहीसा मागे पडला होता.

कोणताही देश जेव्हा नवीन तंत्रज्ञान आणतो तेव्हा त्या देशाला इतर देशांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायदा होतो कारण कोणत्याही देश आपला स्वार्थ पाहतो आणि इतर इतर देशासाठी ते तंत्रज्ञान फक्त डेटा कलेक्शन काम करत राहतात. त्यामुळेच भारताला स्वतःच्या अशा AI मॉडेल तंत्रज्ञानाची गरज होती  आणि ते आता आला आहे. नाव आहे “कृत्रिम” आणि आणला आहे ओलाचे भावेश अग्रवाल यांनी(Ola Krutrim Al).

Krutrim हे भारताचे किंवा भारतीय कंपनीने बनवलेले पहिले AI टूल आहे. Ola ह्या कार रेंटल सेवा आणि इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीचे CEO भावेश अग्रवाल यांनी हे Krutrim(कृत्रिम ) १५ डिसेंबर रोजी ते लाँच केले. भावेश अग्रवाल आणि कृष्णमूर्ती वेणू तेंनेती यांनी १५ एप्रिल 2023 रोजी Krutrim Si Designs(कृत्रिम एस आय डिझाइन्स) या नावाने कंपनी रजिस्टर केली होती आणि तेव्हापासूनच चर्चा चालू होती कि कधी येणारे हे भारतीय AI टूल.आणि कंपनीने ह्याची प्रतीक्षा संपवली. कंपनीच्या म्हणण्यानुसार ह्या ola AI tool ला ट्रेन करण्यासाठी दोन ट्रिलियन एवढा डेटा दिला गेला आहे आणि हे चाट जीपीटीच्या चौथ्या वर्जन पेक्षा जास्त उपयोगी आणि जास्त शक्तिशाली असेल आणि स्पर्धेच्या बाबतीत चाट जीपीटीला (ChatGPT) मागे टाकत आहे.

India's first own AI. Ola Krutrim Al
At ola AI launch event

 

ह्याच्या लाँच च्या वेळेस भावेश अगरवाल म्हंटले “AI हे अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचा भविष्यातील नमुना ठरवणार आहे. भारतातील पहिला AI लॉन्च करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे जो आमच्यासाठी अद्वितीय आहे, आपले भविष्य आपल्या परंपरांशी जोडणारा आहे. AI नक्कीच सर्व काही बदलून टाकेल आणि भारताला जगातील सर्वात उत्पादक, कार्यक्षम आणि सशक्त अर्थव्यवस्था बनवेल. आज सर्व AI मॉडेल्स, ज्यांना LLM म्हणतात, हे इंग्रजीमध्ये प्रशिक्षित केले जातात, परंतु आपल्यासाठी भाषा केवळ संभाषणाची गोष्ट नाही. भाषा ही सांस्कृतिक मूल्ये, संदर्भ आणि आचारसंहिता यांचेही प्रतिबिंब आहे आणि Krutrim AI मॉडेल भारताची संस्कृती, ज्ञान आणि आमचा बहुसांस्कृतिक, बहुभाषिक वारसा लक्षात घेऊन निर्माण करण्यात आले आहे जे कुठेही कमी पडणार नाही . “

Artificial या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये Krutrim असा होतो. हे AI टूल दोन ऑप्शनमध्ये येईल , पहिला ऑप्शन Krutrim आणि दुसरा ऑप्शन आहे Krutrim PRO आहे जो पुढील वर्षी लॉन्च करण्यात येईल .

click here

नवनवीन update साठी :: Click Here

India’s first own AI -Ola Krutrim Al (कृत्रिम) हे Chat GPT पेक्षा चांगलं कसे आहे?

आपल्याला चार जीपीटी चा उपयोग करायचा असेल तर इंग्लिश मध्ये चांगली उत्तर देते पण जर आपण जीपीटीला स्थानिक भाषा मध्ये प्रश्न विचारला तर ते बिचार गंडतय. कृत्रिम हे २२ पेक्षा जास्त भारतीय स्थानिक भाषेत काम करते आणि १० हून जास्त भाषेमध्ये उत्तर देईल. हे भारतातील पाहिलं AI टूल आहे (India’s first own AI)आणि भारताच्या परंपरा,सण,उत्सव आणि संस्कृती चांगल्या प्रकारे समजू शकते.

उदाहरणार्थ जर आपण चाट जीपीटीला भारतीय सणांबद्दल विचारलं तर ते त्याबद्दल जी माहिती सांगतोय ते अगदी पश्चतांच्या नजरेतून सांगत आहे. ते आपल्याशी जुळेलच असं नाही पण “कृत्रिम” हे भारताचे सण या विषयावर अगदी तंतोतंत माहिती देऊ शकते कारण त्याला तसा डेटा देण्यात आला आहे भारतीय म्हणून आपण हे सण कसं साजरा करतो आपल्याला याचा काय महत्व आहे, या सणाचा काय विशेष आहे हे सांगू शकतो तेही एका भारतीयाच्या नजरेतून जे किं वस्तूस्थितीशी मिळते जुळत असेल.

Ola Krutrim Al
At ola AI launch event

Voice कमांड

यामध्ये टायपिंग बरोबरच हे आपण जे बोलू ते समजून म्हणजे व्हॉइस कमांडवरही काम करू शकते. हे आवजाने दिलेला आदेश समजू शकतं तसंच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आवाजात देण्यास समर्थ आहे ज्यामुळे अपंग लोकांनाही याचा खूप फायदा होऊ शकेल.

पुढील महिन्यापासून www.olakrutrim.com ह्या साईटवर जाऊन आपण त्याचा हे AI टूल वापरू शकतो.

 

हे ही वाचा: काय आहे मोदींचा तेजस फायटर जेट च्या उड्डाणातून जगाला 1 छुपा संदेश.

Ola Krutrim Al(कृत्रिम) चा देशाला फायदा काय?

Ola जे हे कृत्रिम AI  ला आहे हे देशासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जेव्हा पण इंटरनेट संबंधित काही क्रांती झाली तसेच सोशल मीडिया असेल गुगल असेल किंवा इ कॉमर्स या स्पर्धेत भारत कधीच जागा मिळू शकला नव्हता आणि ज्याचं तंत्रज्ञान तो देश राजा अशीही काहीशी गोष्ट आहे. ह्या भारतीय मुळे भारत सुद्धा इंटरनेटच्या स्पर्धेत उतरला आहे आणि ही गोष्ट भारतीय म्हणून आपणासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे आणि या ह्या भारतीय मॉडेलचा देशाला नक्कीच फायदा होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments