botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
Homeअर्थमंत्रwhy rbi ban bajaj finance card- Bajaj Finance card बंदी

why rbi ban bajaj finance card- Bajaj Finance card बंदी

RBI ने बजाज फायनान्सवर कारवाई का केली|| why rbi ban bajaj finance card

RBI ची बजाज फायनान्स वर मोठी कारवाई केली आहे.ज्यामध्ये लोकप्रिय असे Bajaj Finance card समावेश आहे.. (Bajaj Finance card. why rbi ban bajaj finance card?) तर काय कारण आहे जाणून घेऊया…

काय आहे कारवाई 

 बजाज फायनान्स  चे दोन  प्रॉडक्ट आहे eCom आणि इंस्टा ईएमआय कार्ड  (Insta EMI) म्हणजे bajaj finance card , ह्या दोन माध्यमातून कर्ज  वितरण आणि कर्ज मंजुरी थांबवण्याचे आदेश  RBI ने दिले आहेत. RBI च्या निवेदनानुसार रिझर्व बँक कायदा १९३४ च्या कलम ४५ L (१) (B) ह्या कर्ज वाटपाला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना ह्या सेवेचा लाभ घेता येणार नाही. 

“डिजिटल लेन्डिंगच्या नियमाचे पालन न केल्याबद्दल हि कारवाई केली गेली आहे”

Bajaj finance InstaEMI card Bajaj Finance card. why rbi ban bajaj finance card

RBI ने बजाज फायनान्सवर कारवाई का केली

Bajaj Finance card.why rbi ban bajaj finance card

ह्या कर्ज वितरणावर बंदी घालण्याचे कारण देण्यात आले आहे कि कंपनीने ग्राहकांना दिलेल्या key fact statement(KFS) मध्ये पारदर्शकता नाही. KFS हे असे डॉक्युमेंट असते ज्यात कर्जा विषयक महत्वाची माहिती असते. जस की कर्जाच्या अटी आणि शर्ती(T&C) व्याजाचा कार्यकाळ इत्यादी माहिती असते.

RBI च्या मार्गदर्शक तत्वामध्ये KFS  कर्जाची रक्कम,कालावधी,व्याजदर,परतफेड रक्कम,शुल्क, देय आणि इतर महत्वाच्या गोष्टी ह्याची माहिती कर्ज देणाऱ्या बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेने कर्जदाराला देणे आवश्यक असते.बजाज फायनान्स ने ह्या गोष्टीचा तपशील पारदर्शकपणे दिला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

RBI कडून अशा प्रकारची कारवाई ही पहिल्यांदाच करण्यात आलेली नाहीये. HDFC बँक,बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) ह्याच्यावर सुद्धा RBI ने काही कालावधी पूर्वी अशी कारवाई केली होती.

आपल्याला माहितीच असेल कि बजाज फायनान्स ही  देशातील आघडीची NBFC(बिगर बँकिंग वित्तीय संस्था) कंपनी आहे,NBFC म्हणजे अशी वित्तीय संस्था जिच्याकडे पूर्ण बँकिंग परवाना नाही.ह्या वर्षीचा कंपनीचा निव्वळ नफा हा ३५५१ कोटी रुपये आहे.कंपनीला निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न हे ८८४५ कोटी रुपये आहे.

बजाज फायनान्सला eCom आणि इन्स्टा EMI माध्यमातून मिळणारे उत्पनाचा वाटा हा एकूण उत्पन्नाच्या कमी प्रमाणात आहे.जर ही बंदी सात ते आठ आठवड्याच्या आत उठवली गेली तर कंपनीच्या नफ्यावर गंभीर परिणाम होणार नाही. पण जर ही बंदी जास्त वेळ राहिली तर ह्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक गणितावर निश्चितच पडेल आणि पुढील आदेश येई पर्यंत कंपनी नवीन ग्राहक जोडू  शकणार नाही.ह्या निर्णयाचा परिणाम कंपनी च्या शेअर दिसून आला आणि बाजार सुरु  झाल्यानंतर बजाज फायनान्स चा शेअर ३.९३ % नी  पडला, पण नंतर हा वाढला..   

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments