Reliance Disney merger :: Reliance Disney Hotstar deal
तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं असं काहीच झालं होतं रिलायन्स टेलिकॉम प्रवेशाने. सगळ्यांना फ्री मध्ये सिम द्यायला सुरुवात केली रोज एक जीबी इंटरनेट आणि फ्री कॉलिंग यावर लोकांच्या अक्षरश उड्या पडल्या पण ह्याने अनेक कंपन्यांचे दिवाळी निघाले, आयडिया वोडाफोन सारखे कंपन्या एकत्र आल्या आणि रिलायन्स बनला मार्केटचा किंग .आता असाच काहीसा होणार आहे OTT च्या क्षेत्रात पण चला जाणून घेऊया कसा ते…..
काय आहे हे Reliance Disney merger ( Reliance Disney Hotstar deal )
टेलिकॉम मार्केट काबीज केल्यानंतर रिलायन्स लक्ष होतं OTT कडे. रिलायन्स कडे आधीच Viacom18 ही कंपनी असल्यामुळे टीव्हीचे चॅनल्स आधीच होते, पण OTT नव्या जमान्याचा घोडा आहे आणि रिलायन्सला यावरती डाव लावायचा होता आणि त्या दिशेने त्यांनी अजून एक भक्कम पाऊल टाकला आहे ते म्हणजे Reliance Disney merger द्वारे हॉटस्टार विकत घेण्याचा (Reliance Disney merger).
काही दिवसापूर्वी ह्या दोन कंपन्यांकडून एक नॉन बाइंडिंग करार झाला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नॉन बाईंडिंग म्हणजे काय? तर नॉन बाइंडिंग म्हणजे प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे, विकत घेतल्या जाणाऱ्या कंपनीची किंमत ठरवली जाईल व दोन्ही कंपन्यांना हा सौदा योग्य वाटला नाही तर हा करार पूर्ण केला जाणार नाही व ह्या नॉन बाईंडिंग करारामुळे रिलायन्स वरती कायद्याने हा करार पूर्ण करण्याचं कोणतेही बंधन असणार नाही.
आपल्याला आठवतच असेल की काही दिवसांपूर्वी एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि नंतर आपला निर्णय माघारी घेतला तेव्हा ट्विटरने एलोन मस्क यांना कोर्टात खेचले होते. कारण तेव्हा एलोन मस्क व ट्विटर मध्ये लीगली बाइंडिंग करार झाला होता आणि एलोन मस्क यांना तो पूर्ण करणे कायदेशीर रित्या बंधनकारक होते. असं एक असं कोणतंही बंधन रिलायन्स ला ह्या Reliance Disney merger डील मध्ये असणार नाही.
ही Reliance Disney Hotstar deal फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि Reliance Disney merger नुसार रिलायन्स कडे 51% हिस्सा व डिस्नी कंपनीकडे 49% हिस्सा राहील. ह्यात जास्त हिस्सा असल्यामुळे रिलायन्स कडे याचं नियंत्रण राहील व नवीन मंडळावरती दोन्ही बाजूने दोन दोन संचालक असतील.
Reliance Disney merger( Reliance Disney Hotstar deal ) डिस्नी का विकतंय आपली कंपनी?
गेल्या काही वर्षांपासून ह्या दोन कंपन्यांमध्ये थेट स्पर्धा चालू होती मुकेश अंबानींची रिलायन्स गेल्या काही काळापासून खूपच आक्रमकपणे या क्षेत्रात पाऊल टाकत होती. आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क रिलायन्सला भेटल्यानंतर रिलायन्स हॉटस्टार च्या तुलनेतच पुढे निघून गेलो होतो. या स्पर्धेत रिलायन्स ने हॉटस्टार वर बाजी मारण्याची काही प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे जिओ सिनेमा(Jio Cinema) हा ग्राहकांना एकदम फ्री आहे तर Disney- Hotstar चे पैसे देऊन सबस्क्रीप्शन घ्यावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे IPL चे मोबाईल प्रसारणाचे हक्क रिलायन्सला भेटणे.
रिलायन्स ने 23 हजार 758 कोटी रुपये एवढे बक्कळ पैसे देऊन हॉटस्टार कडून हे हक्क हिसकावून घेतले आणि या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाला लोकांना जिओ सिनेमाच्या माध्यमातून फ्री मध्ये दाखवायला सुरुवात केली, . आयपीएल बरोबरच रिलायन्सने फुटबॉल वर्ल्ड कप तसेच भारतात होणारे क्रिकेटचे सामने यांच्याही हक्क आपल्याकडे घेतले. त्यामुळे Disney- Hotstar मी जवळजवळ चाळीस लाख सबस्क्राईबर गमावले आणि हा नंबर वाढतच जातोय.
खेळाबरोबरच रिलायन्सने वेगवेगळ्या चित्रपट व शोच्या कॅटेगरीतही डाव मारला. रिलायन्सने वॉर्नर ब्रदर्स या जगप्रसिद्ध स्टुडिओ बरोबर करार करून HBO दिसणारे चित्रपट,वेगवेगळे शो Jio Cinema वर आणले, जसं की प्रसिद्ध Game of Thrones (गेम ऑफ थ्रोन्स) असेल succession ही सिरीज असेल, हॅरी पॉटर असेल किंवा The Last of Us असे टीव्ही शो जे की पूर्वी बऱ्याच वर्षापासून Disney- Hotstar वर यायचे व रिलायन्सने वॉर्नर ब्रदर्स बरोबर करार केल्यामुळे ते जिओ सिनेमा वरती यायला लागले. या कारणांमुळे Disney- Hotstar चे प्रेक्षक कमी होत होते तर रिलायन्सचे वाढत होते. सध्याच्या घडीला हॉटस्टार कडे भारताचे परदेशात होणारे क्रिकेट सामने यांचे प्रक्षेपण आणि marvel सिरीज चे शो त्यांच्या स्वतःच्या बॅनरखाली असलेल्या वेब सिरीज एवढेच आहे.
नवनवीन update साठी :: Click Here
Reliance Disney merger( Reliance Disney Hotstar deal) चा काय परिणाम होईल?
ह्या दोन्ही कंपन्या एक झाल्यानंतर तर क्रिकेटचे प्रक्षेपण म्हणजे रिलायन्स असं समीकरण होऊन जाईल कारण आयपीएल मोबाईल प्रक्षेपणाचे हक्क रिलायन्स कडे आहेत आणि टीव्हीचे स्टार कडे व भारताचे आंतरराष्ट्रीय सामन्याचे जे प्रदेशात होतात ते स्टार कडे आहेत आणि भारतात होतात ते रिलायन्स कडे आहेत ह्या Reliance Disney Hotstar deal डील नंतर सगळे रिलायन्स कडे येईल खेळ , चित्रपट सगळे रिलायन्स कडे म्हणजेच Viacom18 कडे येईल.
Reliance Disney merger या डीलमुळे सध्या जो काही आर्थिक तोटा Disney- Hotstar सहन करतोय तेही कदाचित यातून भरून निघेल. OTT बरोबर स्टार कडे असलेले खेळाचे, प्रादेशिक व वेगवेगळे चॅनल्स सुद्धा रिलायन्स कडे येतील.आणि या मार्केटमध्ये रिलायन्स वर्चस्व राहील याद्वारे भारततातील रिलायन्स ही एक सर्वात मोठ्या मीडिया कंपनीपैकी एक होईलच पण भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असेल.
Reliance Disney merger(Reliance Disney Hotstar deal) मुळे सध्याच्या सब्स्क्रिबर च काय होईल?
या करारानंतर दोन्ही कंपन्या एक होतील आणि हॉटस्टार व जिओ मधील कंटेंट एकाच ॲप मध्ये पाहता येईल किंवा आहे तसेच दोन्ही वेगवेगळे राहतील, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही येणारा काळच यावर उत्तर असेल. कदाचित रिलायन्स ह्या नवीन ओटीपी साठी एक स्वस्तातला नवीन प्लॅन त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे रिचार्ज करावी लागणार नाहीत त्यामुळे लोकांचे पैसे वाचतील आणि त्यामुळे सुरू होईल ओटीपी मधील स्पर्धा आता ह्या डील नंतर राहतील मुख्यतः चार OTT कंपन्या राहतील त्या म्हणजे जिओ एंटरटेनमेंट, सोनी नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम.
हेही वाचा :: Jio Satellite Internet
Reliance Disney merger( Reliance Disney Hotstar deal) मुळे वाढेल स्पर्धा.
रिलायन्समुळे( Reliance Disney merger मुळे ) आता यात सबस्क्रिप्शनचं दर युद्ध सुरू होईल आणि ग्राहकांना यात फायदा होईल. स्वस्तात OTT सेवा देण्याची स्पर्धा लागेल आणि आपोआप बाकीच्या कंपन्या या ओढल्या जातील आणि टेलिकॉम सारखं युद्ध इथे सुरू होईल. यात कोणती कंपनी टिकून राहते आणि कोण कशा गुंडाळून जाते हे येणारा काळच ठरवेल पण सध्या तरी रिलायन्स यात आघाडी घेईल असं दिसून येतेय. कारण रिलायन्स आपल्या जिओ मार्फत रिचार्जचे दर ठरवणारे पण तेच असतील आणि OTT सेवा देणारे पण तेच.