botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयResearch and Analysis Wing|| R&AW or RAW || काय आहे रॉ, का...

Research and Analysis Wing|| R&AW or RAW || काय आहे रॉ, का केली सुरुवात, काय काम करते ?

अमेरिकन नागरिक आणि खलिस्थानी समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू ह्याच्या हत्येचा कट फसला आणि रॉ एजन्ट निखिल गुप्ता ह्यांना अटक झाली, आणि ही भारतीय गुप्तचर संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली. चला तर जाणून घेऊया काय आहे रॉ, का केली सुरुवात आणि कोणते मिशन Research and Analysis Wing ने पूर्ण केले आहेत …..

रामेश्वरनाथ काव (R N Kao) यांच्याकडे RAW सुरुवात करण्याची श्रेय जाते. रामेश्वरनाथ काव हे RAW चे पहिले प्रमुख होते आणि यांच्या डोक्यातून R&AW ची सुरुवात करण्याची कल्पना आली होती.

Raw ची सुरुवात::

१९६२ साली जेव्हा चीनकडून भारताचा पराभव झाला तेव्हा हे अपयश खूपच लाजिरवाणी होतील चीन नेमका काय करतो आणि त्याची पुढची खेळी काय असेल ह्याचा अंदाज आपल्याला आला नाही तेव्हा लक्षात आलं की शत्रू राष्ट्र नेमकं काय करताय आणि त्यांच्या आतील खबर मिळवणे किती आवश्यक आहे आणि यासाठी एक वेगळी गुप्तचर यंत्रणा आवश्यक आहे हे लक्षात आलं कारण चीनच्या हालचाली आधीच लक्षात आल्या असते तर थोडी आपयशाची तीव्रता कमी करता आले असती.आणि या युद्धानंतर इंटेलिजन्स ब्युरो(IB) पासून एक वेगळी तयार करण्यात आला ते म्हणजे Research and Analysis Wing(RAW)
ह्याच RAW चा १९७१ च्या पाकिस्तान बरोबर च्या युद्धात खूप मोठा हातभार लागला आणि स्वतंत्र बांगलादेश ची निर्मिती झाली.

RN-KAO
RN-KAO

बर आता खूपच यंत्रणा तर सुरुवात केलीये पण देशाला याचा काहीच अनुभव नव्हता तेव्हा अमेरिकेचे गुप्तचर संस्था सीआयए(CIA) ने रॉ ला सुरुवातीच्या काळात ट्रेनिंग दिले होते. रॉ नी आपल्या अधिकाऱ्यांना व एजंट्स ना ट्रेनिंग देण्यासाठी वेगळ्या देशांचे सहकार्य घेतले जसे की ही इस्राईल ची गुप्तहेर संस्था मोसाद. सध्याचा रॉ चा काम करण्याचा पॅटर्न बघता तो मोसादशी मिळताजुळता आहे कारण भारताचे इस्राईल बरोबर वाढत असलेले राजकीय संबंध. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईल ला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत आणि याचा निश्चितच प्रभाव या गोष्टी वरती असेल. इस्रायल शेतीच्या बाबतीत प्रगत आहेतच पण संरक्षण आणि शस्त्राच्या बाबतीतही प्रगत आहे. त्यांचे गुप्तहेर संस्थांसाठी त्यांच्या काम करण्याच्या पॅटर्नमुळे जगप्रसिद्ध आहे.

सुरुवातीच्या काळात असं म्हणलं जायचं की रॉ च काम हे आहे की जर कोणता देश भारताविरुद्ध कोणतीही काम करत असेल तर त्याची माहिती गुप्तरित्या मिळवणे आणि ते मिशन हाणून पाडणे. पण कालांतराने लक्षात आलं की रॉ चं मिशन फक्त कोणत्या परकीय देशाविरुद्ध नाही तर आतंकवादी संघटनांबरोबर सुद्धा आहे. देशाला धोका हा आतंकवादी संघटना पासूनही तेवढाच आहे.आणि गंभीर गोष्ट म्हणजे हे दहशतवादी संघटना कशा प्रकारे काम करतात हेच लगेच समजून येत नाही. आणि हे दहशतवादी सहजपणे नागरिकांमध्ये मिसळून राहतात आणि ह्यालाच काउंटर अटॅक करण्यासाठी गुप्तचर संघटना मजबूत असणे आवश्यक आहे.

 

click here

नवनवीन update साठी :: Click Here

 

Research and Analysis Wing चे प्रमुख कामे::

१. परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे :

रॉ प्रमुख काम म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे यासाठी आपल्या देशाचे एजंट हे वेगवेगळ्या देशांमध्ये असणे आवश्यक असते मग मित्रांनो प्रश्न येतो की रशिया तर भारताचा मित्र आहे किंवा अमेरिका सुद्धा भारताचा मित्र आहे.

पण आंतरराष्ट्रीय संबंध मध्ये कोणीही कुणाचा परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो. यामध्ये राष्ट्रीयहित प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे असते.

आता बघा भारत हा रशियाचा मित्र आहे तर पाकिस्तान भारताचा शत्रू आहे पण तरीही रशिया पाकिस्तानला ‘दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी’ या नावाखाली शस्त्र देते, त्यामुळे कोणीही मित्र नाही किंवा कोणीही ही शत्रू नाही हे तत्त्व आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असते.

रशियाला या शस्त्र विक्रीतून पैसे मिळतो तर ह्या शस्त्रांपासून आणि पाकिस्तानपासून भारतीताला धोका असतो म्हणून कोणीही मित्र असला तरी आपला स्वार्थ बघणाराच म्हणून गुप्त बातम्यांचा शोध लावण्यासाठी मित्र देशात किंवा शत्रू देशात गुप्तहेर आवश्यक असतात.

२. Counter Proliferation

जर कोणता देश आपला आणू बॉम्ब निर्मितीवर काम करून आपली अणु शक्ती वाढवत असेल तर त्याची माहिती गोळा करणे. उदाहरणार्थ पाकिस्तान मधील काहुटा ऑपरेशन. कहुटा मध्ये पाकिस्तानचा एक न्यूक्लिअर प्लांट आहे. तिथं पाकिस्तानातील शास्त्रज्ञ आपले केस कापायला एका दुकानात जात असतात. या शास्त्रज्ञांचे केस भारतीय गुप्तहेरांनी मिळवून त्यावर टेस्ट केल्यानंतर लक्षात आले की यात प्लुटोनियमची मात्रा जास्त आहे. वीज निर्मितीसाठी प्लॅटिनची मात्रा एवढी जास्त लागत नाही. तर अणुबॉम्ब बनवण्यासाठी मात्र ही जास्त लागते आणि मग लक्षात आले की पाकिस्तान अणुबॉम्ब बनवण्याचा ऑपरेशन मध्ये आहे आणि हा भविष्यामध्ये भारताविरुद्ध वापरला जाऊ शकतो आणि मग सुरू झाले या विरुद्धचे कार्य.

३. देशाच्या संरक्षण विषयी पॉलिसी वरती सल्ला देणे.

देशाच्या संरक्षण दिनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पॉलिसी ठरवण्यास  सरकारला सल्ला देते व मदत करत करते. जसे की राष्ट्र सुरक्षा विषयक पॉलिसी, दहशतवाद विरोधी पॉलिसी.

४.Counter Terrorism::

देश विरोधी दहशतवादी कारवायांची माहिती मिळवणे आणि त्या थांबवणे उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी इसिस(ISIS) ही संघटना भारतामध्ये काही दहशतवादी कारवयांचा कट रचत होती. पण याची माहिती R&AW च्या गुप्तहेरानां मिळाली आणि या कटाशी संबंधित लोक पकडले गेले आणि इसिसच(ISIS) ऑपरेशन RAW ने हाणून पाडलं.

५. देशाच्या न्यूक्लिअर प्रोजेक्ट ला सुरक्षा पुरवणे.

भारताच्या पोखरण एक या मोहिमेला अमेरिका,इंग्लंड याबरोबर अनेक देशांनी विरोध केला होता. कोणत्याच देशाला वाटत नव्हते की भारतानेही अणुचाचणी करावी पण भारताने अतिशय गुप्त पद्धतीने ही चाचणी यशस्वी पूर्ण केली त्या वेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही जबाबदारी RAW प्रमुख R N काव यांना दिली आणि रॉ ने ती यशस्वीपणे पूर्ण केले.

 

Raw-logo
Raw-logo

रॉ चे  स्ट्रक्चर

ROW थेटपणे देशाच्या पंतप्रधानांच्या अंडर येते. आणि असेही म्हटले जाते की Research and Analysis Wing चे प्रमुख हे रोज हाती आलेली माहिती राष्ट्रीय सल्लागरांशी शेअर करतात. सध्या श्री अजित डोबल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

देशात R&AW चे दहा ठिकाणी ऑफिस आहेत ज्याला स्पेशल ब्युरो म्हटलं जातं आणि या दहा स्पेशल ब्युरो कडून देश आणि देशाबाहेर माहिती एकत्र करण्याचं काम केलं जात.

R&AW च्या यशस्वी मोहिमा

१. पोखरण-१

भारताची पहिली अणुचाचणी पोखरण-१ ज्याला हसणारा बुद्ध (Smiling Buddha)हे कोण नाव दिलं गेलं होतं या चाचणीची सर्व जबाबदारी RAW देण्यात आली होती. रॉ ने हे ऑपरेशन अतिशय गुप्त पद्धतीने पूर्ण जगाला न कळता पुर्ण केले. भारताने जेव्हा हे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले तेव्हा अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयए पाकिस्तानची आयएसआय चीनची एमएसएस हे सर्व थक्क झाले.

२. खलिस्तानी चळवळ
1980 दशकात पंजाब भागात खरी सरी चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि यामागे होतं पाकिस्तान. Raw निशा ऑपरेशन साठी दोन टीम बनवल्या CIT-X आणी CIT-J.
CIT-X च टारगेट होतं थेट पाकिस्तान. CIT-J सट्टा मार्केट होतं खाली स्थानी समर्थक ग्रुप.

३. ऑपरेशन कहूटा
आपण वरती वाचलंच असेल की पाकिस्तानचे अणुबॉम्ब मिशन त्यांचा शस्त्रज्ञानांच्या केसावरून आणि कसं शोधून काढलं.

४. ऑपरेशन चाणक्य
हे ऑपरेशन रॉ ने कश्मीरमधील दहशतवाद संपण्यासाठी सुरू केलं. ह्याच ध्येय होतं जे दहशतवादी आहेत व ज्यांना पाकिस्तानची फूस आहे त्यांना संपवणे आणि कश्मीरमध्ये शांतता पुन्हा आणणे. यामध्ये प्रो कश्मीर ग्रुप तयार करणे त्यांना पाठबळ देणे आणि जे भारताविरुद्ध आहेत त्यांच्यात दूही निर्माण करणे व त्यांना संपवणे.

आणि ह्यात असे अनेक ऑपरेशन्स आहेत जे कधी जगासमोर येणार नाहीत

 हे ही वाचा :: काय आहे मोदींचा तेजस फायटर जेट च्या उड्डाणातून जगाला 1 छुपा संदेश

मुंबईमधील 26/11 आणि पुलवामा आणि पठाणकोट मधील दहशतवादी हल्ला यामध्ये ह्या गुप्तचर यंत्रणांना हल्ल्याचा पूर्वांदाज लावता आला नाही. या घटनेनंतर RAW ची पुनर्रचना करायचं सरकारने ठरवलं आणि 70 ते 80 अधिकाऱ्यांना सरकारने सक्तीने रिटायर केले.

आज आपण बघू शकतो की सध्याची ऑपरेशन्स आहेत ती मोसाद या गुप्तहेर संघटनेच्या मार्गावर जात आहेत ज्यामध्ये भारत देशाविरुद्ध कार्य करणाऱ्या संघटना किंवा लोकांना जिथे असेल तिथे हुडकून आणणे किंवा sh@@t to de@th.

जय हिंद !!

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments