botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाकोण आहे महान सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली.

कोण आहे महान सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली.

कोण आहे महान सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली?

कोण आहे महान सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली,कोणत्या पैलू वरती ही तुलना होत राहील जाणून जाणून घेऊया ….

साल होत २०१२ महिना मार्च,सचिनच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकाबद्दल मुकेश अंबानी यांनी एक पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी सलमान खान ने सचिन ला प्रश्न विचारला “सचिन काय वाटतं,कोण तोडू शकेन हा रेकॉर्ड ?”. सचिन म्हणाला “ह्याच खोलीत बसलेत ते दोन लोक विराट आणि रोहित आणि कोणी भारतीयाने हा रेकॉर्ड मोडला तर मला ह्याच काहीच वाईट वाटणार नाही “

कट टू १५ नोव्हेंबर २०२३, सामना वर्ड कप च्या सेमी फायनलचा . विराटने  ह्या सामन्यात आपले ५० वे एकदिवसीय शतक पूर्ण करून सचिनच्या एकदिवसीय शतकाचा जागतिक विक्रम सचिनच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मोडून सचिन चे शब्द खरे केले.शतकाबरोबर अजून एक सचिन चा विक्रम विराटने मोडला तो म्हणजे एका वर्डकप मध्ये सर्वाधिक धावांचा. 

खरंतर सचिन आणि विराटची तूलना करणं हे कधीही शक्य नाही आणि ते करायचा प्रयत्न मध्ये दोघांच्या यशाचा आणि क्रिकेट कौशल्याचा अनादर करणं होईल. कारण सचिन ने सचिन ज्या काळात खेळाला तो काळ आणि आत्ता विराट खेळात असलेला हा पूर्णपणे भिन्न. त्या काळाचे संघ, क्रिकेट चे नियम, तेव्हाचे खेळाडू हे आणि आताचा काळ म्हणजे समुद्राची दोन टोकं. पण मानवी स्वभावच असा आहे कि कितीही नाही म्हंटलं तरी तुलना ही  होणारच. 

Sachin and virat after 49th century

सचिनचा काळ

सचिन संघात असताना तो संघाचा एकमेव तारणहार होता आणि सचिन ने नेहमी ती जबाबदारी त्याकाळी नेहमी पार पाडली.  सचिन त्याकाळी ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान अश्या तगड्या संघाबरोबर भिडला. पण आता ती जादू या संघात राहिली नाहीये. सचिन ग्लेन मॅग्रा,शेन वॉर्न, शेन पॉलक, चामिंडा वास, मुथय्या मुरलीधरन ह्या अशा गोलंदाजांशी दोन हात केले. तर ब्रेट ली,शोएब अख्तर,वकार युनूस, वसीम अक्रम, डेल स्टेन अशा तेज तर्राट गोलंदाजीचा सामना केला. 

त्या तुलनेत विराटला अशा कसलेल्या बॉलर ला भिडायची संधी मिळाली नाही पण म्हणून विराटने पण काही सध्या बॉलरचा सामना केला असे नाही,दक्षिण आफ्रिकेचा रबाडा असेल, मलिंगा, जॉन्सन,मिचेल स्टार्क, शाहीन आफ्रिदी हे कसलेले बॉलर आहेतच की आणि  आणि १५० च्या स्पिड ने टाकणारा मार्क वूड चा सामना विराटने केलाय. 

सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली :: लोकप्रियता

सचिन तर क्रिकेटचा देव, सचिनच्या काळात मॅच असली की सचिन किती वर खेळतोय हा प्रश्न सर्रास विचारला जायचा आणि सचिन आऊट झाल्यावर कितीतरी टीव्ही बंद व्हायचे आणि सचिन रिटायर्ड झाल्यावर आम्ही क्रिकेट बघायचा सोडून दिलं असे बोलणारे पण खूप दिसतील.

पण ह्या लोकप्रियतेच्या बाबतीतही विराट सुध्दा सचिनच्या मागे नाहीये. भारताचा सामना असेल आणि मैदानावर जर एक नजर फिरवली तर आपल्याला 18 नंबर असलेली विराटची जर्सी खूप मोठ्या संख्येने दिसेल. ह्यावरून आपल्याला विराट नावाचं भारतीय क्रिकेट संघातील स्थान  काय आहे याचा अंदाच येईल. विराटच्या  लोकप्रियतेच्या बाबतीत आजून एक गोष्ट सांगता येईल ज्याने विराटची लोकप्रियताही जगात किती आहे याची कल्पना येईल. 

र गोष्ट अशी आहे कि, २०२८ मध्ये लॉस अँजेलिस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी क्रिकेटचा समावेश करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय झाला,याची घोषणा करताना  २०२८ च्या ऑलम्पिकचे संचालक निकोलो कॅम्परिणी (Niccolo Campriani)   यांनी बोललेले वाक्य विराटच्या लोकप्रियतेची कल्पना देण्यास पुरेशी आहे. “विराट कोहली हा आजच्या काळात सोशल मीडियावर तिसरा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे, २६ कोटीहून जास्त त्याचे फॉलोवर्स आहेत.हा आकडा लेब्रॉन जेम्स आणि टायगर वूडस यांच्या एकत्रित फॉलोवर्स संख्येहून कितीतरी जास्त आहे.”

virant and sachin playing together

सचिन Vs विराट :: शतके 

सचिनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ४९ शतके झळकवली त्यातील ३२ शतके पहिली बॅटिंग करताना आणि धावांचा पाठलाग करताना १७ शतके. पण विराट ह्याबाबतीत  सचिनला पछाडतो, विराटने आपल्या ५० शतकांपैकी  २७ शतके धावांचा पाठलाग  करताना केलीत तर २३ शतके पहिली बॅटिंग करताना केलीयेत. बरं मंग पुढचा मापदंड येतो शतके आणि संघाचा विजय, इथं विराट सचिनच्या पुढं आहे. विराट च्या ५० शतकांपैकी ४२ शतकं संघाच्या विजयात हातभार लावणारी आहेत तर सचिनच्या ४९ शतकांपैकी ३३ शतकांनंतर भारतीय संघ विजयी झाला होता. म्हणून ह्या शतकांच्या मोजपट्टीवर विराट सचिनच्या पुढे राहतो. 

खेळाचे नियम :

सचिन आणि  विराट  ह्यांचा कालखंड वेगळा होता तसाच काळानुसार खेळाच्या नियमातही बदल होत गेले. जसा कि DRS, हा DRS चा नियम २०११ साली लागू झाला म्हणजे सचिन रिटायर्ड होयच्या फक्त १ वर्ष आधी. त्याचबरोबर पॉवर-प्ले चे नियमसुद्धा बदलत गेले. साल १९९२ ते २०१२ पर्यंत पहिल्या २० ओव्हर मध्ये फक्त २

क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कल च्या बाहेर आणि २१ ते ५० ओव्हर ५ क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कल च्या बाहेर  ठेवण्यास परवानगी होती.२०१२ नंतर हा नियम बदलला आणि १ ते १० ओव्हर २ क्षेत्ररक्षक, ११ ते ४० ओव्हर ४ क्षेत्ररक्षक आणि ४१ ते ५० ओव्हर ५ क्षेत्ररक्षक  ३० यार्ड सर्कल च्या बाहेर असा नवीन नियम आला. म्हणजे सचिनच्या काळात  २ क्षेत्ररक्षक  ३० यार्ड सर्कल बाहेर २० ओव्हर साठी असायचे आणि आज फक्त १० ओव्हर साठी. 

ह्याबरोबर अजून एक नियम २०११ साली आला, तो म्हणजे दोन्ही एंड ला नवीन बॉल. ह्या नवीन नियमामुळे बॉल फक्त २५ ओव्हर्सच जुना होतो. पूर्वी  फक्त एकाच बॉल दोन्ही एंड ला असल्यामुळे हा जुना बॉल रिव्हर्स स्विंग होयचा पण आजचा बॉल त्याकाळा सारखा रिव्हर्स स्विंग होत नाही ह्याचा फायदा बॅट्समनला होतो.पण विराटचा “क्लास” आणि कौशल्य बघता तो या नियमांना  सुद्धा सहज पार करून गेला असता.

सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली ICC स्पर्धा:

ICC च्या महत्वाच्या स्पर्धा जस वर्डकप, चॅम्पियन ट्रॉफी  अशा स्पर्धामध्ये सचिनने ६१ सामन्यात २७१९ धावा तर विराट कोहलीने २२६० रन्स केलेत. तसेच ह्या स्पर्धा मधील बाद  फेरी किंवा नॉकआऊट सामने जसे कि क्वाटर्र फायनल ,सेमी फायनल आणि फायनल अश्या सामन्यात सचिनने १४ सामन्यात ६५७ रन्स केलेत तर न्यूझिलंड बरोबरच्या ह्या २०२३ मधील विश्वचषकामधील सेमीफाइनल सामान्यांपर्यंत विराट कोहलीने ११ सामन्यात ३८७ रन्स केलेत ह्या गोष्टीत सचिन तेंडुलकर विराट कोहलीपेक्षा उजवा ठरतो. 

कर्णधार ::

सचिनने ७२ एकदिवसीय  सामन्यात भारताचा नेतृत्व केलाय ह्या ७२ पैकी २३ सामन्यात संघ विजयी राहिला, ह्या ७२ सामन्यात सचिनने कर्णधार म्हणून २०५४ धावा केल्या आणि ह्यात ६ शतकांचा समावेश आहे.तर ह्या तुलनेत विराट कोहलीने ९५ सामन्यात संघाचा नेतृत्व केलंय त्यात त्यातील ६५ सामन्यात भारतीय संघ विजयी झाला आणि कर्णधार म्हणून कोहलीने ५५४९ धावा  केल्या आहेत आणि ह्या ९५ पैकी २१ सामन्यात शतक करून खऱ्या अर्थानं संघाचा नेतृत्व केलं. 

सचिनकडे बघून क्रिकेट खेळायला लागले असे अनेक खेळाडू आहेत ज्यात स्वतः विराट कोहली सुध्दा.जसा प्रत्येक पिढीचा एक नायक असतो,आयडॉल असतो तसा सचिन ८०-९० च्या पिढीचा आयडॉल आहे आणि येणाऱ्या पिढीचा आयडॉल विराट नक्कीच  असेल . 

विराटचे ह्या तुलने बद्दलचा मत :

४९ व्या शतकानंतर कॉमेंटेटर हर्ष भोगले यांनी विराट शुभेच्छा देताना त्याच मत विचारल्यावर विराट म्हणतो

“माझ्या आयडॉलच्या(सचिनच्या) ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिन कडून ५० व्या  शतकासाठी शुभेच्छा येणे हा माझा सन्मान समजतो पण लोंकाना तुलना करायला आवडते, पण सचिन सारखा चांगला बॅट्समन मी कधीच होऊ शकत नाही  He is perfection when it comes to batting, सचिन कायम माझा हिरो राहील. ज्याला लहापणी टीव्ही पाहिलं त्याचा कडून कौतुक होणं हे माझ्यासाठी खूप काही आहे” 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments