काही दिवसापूर्वीच आपण पहिले की पहिल्यांदाच, भारतीय पंतप्रधान मेड इन इंडिया फायटर जेट ‘तेजस’ (Tejas Fighter Jet)उडवत आहे. पीएम मोदींनी भारतीय बनावटीचा फायटर जेट तेजसचे उड्डाण करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आणि सगळीकडे तो झळकला. तर काय कारण आहे मोदींच्या ह्या उड्डणांचे आणि त्यातून काय काय आहे मोदींचा तेजस फायटर जेट च्या उड्डाणातून जगाला छुपा संदेश जातो ते जाणून घेऊया…
नुकतेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने लॉन्च केले आहे आपले पहिले तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ट्विन सीटर. म्हणजे ह्यामध्ये दोन वैमानिक एकाचवेळी उड्डाण करू शकतात, आपण फोटोत पहिलाच असेल समोर एक व्यावसायिक वैमानिक बसलेला होता,आणि पंतप्रधान मोदी मागे बसले होते.
काय आहे तेजस फायटर जेट(What Is Tejas Fighter Jet)?
केंद्र सरकारने १९८३ साली DRDO ला हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती आणि संशोधन कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी दिली त्याअंतर्गत पूर्ण देशी असे हे तेजस विमान तयार करण्यात आले आहे .तेजस ने पहिले उड्डाण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक (TD-1) 4 जानेवारी -2001 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केले होते . देशाचे माजी पंतप्रधान श्री कै.अटलबिहारी वाजपेयी यांनी Light Combat Aircraft (LCA) चे नाव बदलून ‘तेजस’ ठेवले.तेजस हे सर्व प्रकारच्या हवामानामध्ये काम करणारे आणि युद्धप्रसंगी अनेक भूमिका बजावू शकणारे लढाऊ विमान आहे.
हे तेजस फायटर जेट(Tejas Fighter Jet) विमान युद्धप्रसंगी अनेक भूमिका पार पाडण्यास समर्थ असावे ह्या विचाराने केले आहे जे प्रतिकूल हवामान, आणि शत्रूंवर जवळून जमिनीवर हल्ला करण्याची भूमिका सहजतेने पार पडते. हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे म्हणजेच मेड-इन इंडिया फायटर जेट आहे जे जमीन आणि सागरी मोहिमा पार पाडण्यासाठी देखील डिझाइन केलेले आहे.ह्या तेजस च्या निर्मितीचा महत्वाचा टप्पा होता जेव्हा जगाने हे विमान पहिल्यादा पहिले,16 जानेवारी – 2016 रोजी च्या बहरीन इंटरनॅशनल एअरशोमध्ये सहभागी होण्यासाठी तेजसने प्रथम परदेशी उड्डाण केले.
तेजस ची काही प्रमुख वैशिष्ट्ये::
- तेजस फायटर जेट हे त्याच्या वर्गातील सर्वात लहान आणि सर्वात हलके विमान :ह्याची बांधणी आकारमानाने सर्वात लहान व वजनाने हलके करण्यासाठी केली आहे
- सुरक्षा रेकॉर्ड : आता पर्यंत अपघातमुक्त उड्डाणाची उल्लेखनीय अशी कामगिरी
- कंपाऊंड टेल-लेस डेल्टा : बॉम्ब, क्षेपणास्त्रे इत्यादी शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता वाढवते
- फ्लाइट रिफ्यूलिंग (IFR) प्रोब : मोहिमेवर असताना प्रवासाची क्षमता वाढवते. दिवसा आणि रात्रीच्या ऑपरेशनसाठी IFR ची क्षमता सिद्ध झाली आहे.
- ओपन आर्किटेक्चर आधारित मिशन कॉम्प्युटर : स्वदेशी डिझाइन केलेले जे क्षमता, विस्तार आणि वाहन करण्याची क्षमता देते
- क्वाड्रुप्लेक्स-रिडंडंट फ्लाय-बाय-वायर(Quadruplex-Redundant Fly-By-Wire); वैमानिकाला विमानाची हाताळणी सुलभ करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
- AESA RADAR : ह्या तंत्रज्ञानामुळे हे विमान शत्रूच्या रडार ला दिसत नाही.
- तेजसमध्ये विविध प्रकारची लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे जसे कि BVR आणि WVR क्षेपणास्त्रे, बॉम्ब इत्यादि आणि आवश्यक अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहेत.
मोदींचा तेजस फायटर जेट च्या उड्डाणातून जगाला संदेश
हिंदुस्थान ऐरनॉटिकस लिमिटेड ने विमान हे बांधून भारतीय हवाई दलाला दिले आहे , हे तेच विमान आहे जे पहिले पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. पंतप्रधानी ह्यातून उड्डाण केले हे सर्व जगाला दाखवून देणं खूप गरजेचं होत की भारत हा संरक्षणाबाबतीत बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून विकसित देशांच्या तोडीचे तंत्रज्ञान हा भारत विकसित करू शकतो. ज्यावेळी देशाचा पंतप्रधान उड्डाण करतो यामुळे भारतीय हवाई दलाचं मनोबल नक्कीच वाढण्यास मदत होईल.
भारताने रशियाकडून विकत घेतलेलं मिग-21 होते पण हे तंत्रज्ञान आजच्या काळात खूप जुने झाले आहेत आणि आता आपण हळूहळू मेड इन इंडिया बनवत आहोत. जे अधिक सुरक्षित आहेत अधिक आधुनिक आहे, आणि अधिक प्रगत आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी स्वत: विमानात बसतात तेव्हा पहिल्यांदाच सरकार संदेश देत आहे की हे भारतात बनवलेले तेजस लढाऊ विमान खूप आहे सुरक्षित.
नवनवीन माहितीसाठी: Click Here
पीएम मोदी हे स्वत: एक अतिशय प्रसिद्ध जागतिक व्यक्तिमत्त्व आहेत, त्यामुळे त्यांचा उड्डाण करतानाचे हे फोटो हे जगातील मिडिया मध्ये प्रकाशित केले जाईल, यामुळे आपोआप तेजसचा प्रचारही होईल. त्यामुळे तेजसची इतर देशांना निर्यात देखील वाढण्याची शक्यता आहे.ह्यापूर्वीही आपण पाहिले असेल भारतीय राष्ट्रपती लढाऊ विमानांमध्ये बसले आहेत. उदाहरणार्थ, प्रतिभा पाटील पहायला मिळतील.प्रतिभा पाटील ह्या प्रणव मुखर्जी यांच्या आधी देशाच्या राष्ट्रपती होत्या आणि त्यांनी 2009 मध्ये सुखोई फायटर जेटमधून उड्डाण केले होते. सुखोई फायटर जेट भारतीय वायुसेना वापरते पण ते रशियाने बनवलेले आहे. अगदी अलीकडेच भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सुखोई ३० मध्ये उड्डाण केले होते परंतु आजपर्यंत एकाही राष्ट्रपतीने किंवा पंतप्रधानाने मेड-इन-इंडिया (Tejas Fighter Jet) तेजस फायटर जेट मधून उड्डाण केलेले नव्हते.
फायटर जेटची निर्यात
संपूर्णपणे भारतात बनवलेल्या तेजस फायटर जेटमध्ये उड्डाण करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिले अतिशय खास आहे आणि जर आपण तेजसच्या निर्यातीबद्दल बोललो तर, आजपर्यंत कोणत्याही देशाने ह्याची मागणी केलेली नाही किंवा कोणताही अधिकृत करार झालेला नाही, पण अनेक देशांनी तेजस च्या खरेदीची इच्छा दाखवली आहे उदाहरणार्थ नायजेरिया, त्याशिवाय अर्जेंटिना आणि मलेशिया, काही दिवसापूर्वी फिलीपिन्सचीपण चर्चा होती पण अद्याप कोणत्याही देशाने भारतासोबत तेजस लढाऊ विमान खरेदी करण्याचा औपचारिक करार केलेला नाही.
पंतप्रधान मोदी नुकतेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भेट देण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांनी तेजस मधून उड्डाण केले, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे पहिल काम म्हणजे भारतीय हवाई दलासाठी तेजस फायटर जेटची आवश्यकता पूर्ण करणे, आणि कालांतराने ही गरज पूर्ण करेल असे वाटते. पीएम मोदींचे फोटो हे फोटो जसे जसे व्हायरल होतील, तसे जे देश हे विमान खरेदी करण्यास इच्छुक होते ते तेजसच्या डीलरशी संबंधित संभाषण करण्यासाठी पुढे येतील.आणि ज्या दिवशी भारताला तेजसच्या निर्यातीशी संबंधित करार होईल, तेव्हा त्याचा देशाला नक्कीचं एक मोठा फायदा होईल तो म्हणजे परकीय चलन.परकीय चलनाचा साठा अर्थव्यवस्थेसाठी, आपल्यासाठी फायदेशीर ठरेल पण त्याचवेळी भारताचे नाव अशा निवडक देशांच्या गटात येईल जे फायटर जेटची निर्यात करतात .
फायटर जेटची निर्यात करणारे देश
फायटर जेटची निर्यातबद्दल बोलायचे झाले तर जगात मोजकेच देश आहेत जे फायटर जेटची निर्यात करतात. ह्यात मुख्यपणे विकसित देश लढाऊ विमाने निर्यात करतात,ते म्हणजे एकतर युरोपियन देश त्यातही प्रामुख्याने रशिया. रशिया असा देश आहे ज्याचा अर्धा भाग युरोपमध्ये आहे आणि अर्धा आशियामध्ये आहे. त्यांनंतर निर्यात करणाऱ्या देशामध्ये समावेश होतो अमेरिकेचा, त्यानंतर फ्रान्स सुद्धा आपल्या फायटर जेटची निर्यात करतो, फ्रान्सच जे फायटर जेट आहे ‘राफेल’ जे जगातील सर्वोत्तम फायटर जेट मानले जाते. ह्याचा राफेलच्या खरेदीचा करार भारताने फ्रान्स बरोबर केला आहे . ह्या खरेदीवरून राजकारण खूप गाजलं, राजकारण काहीही होऊद्या पण सुखोई फायटर जेट किंवा मिग फायटर जेट ह्या जुनाट तंत्रज्ञानाचा विचार करता ही खरेदी देशहिताची आहेच ह्यात काही विषयच नाही.
ह्या विकसित देशांचच्या तुलनेत ब्राझील हा एकमेव विकसनशील देश आहे ज्याने लष्करी विमानांची निर्यात केली आहे पण त्यांनी निर्यात केलेली विमाने लढाऊ विमानांच्या श्रेणीत येत नाहीत, त्यामुळे जर भारताने निर्यात सुरू केली तर भारत आशियातील दुसऱ्या क्रमांकावर असेल. पहिला क्रमांकावर अर्थात चीन आहे. चीनने पाकिस्तानला लष्करी विमानांची निर्यात केली आहे आणि त्याचबरोबर काही आफ्रिकेतील देशांमध्ये निर्यात केली आहे. .त्यामुळे समस्थ देशवासीयांसाठी ही गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट असेल कि भारतचा ह्या मोजक्या देशांच्या गटात कसे समावेश होईल. आणि जगाच्या राजकारणात भारताचे स्थान वाढवण्यात ही खूप महत्वाचे गोष्ट असेल.