botão whatsapp
back to top
Sunday, December 22, 2024
HomeAutomobileTesla Car || टेस्ला कार ची सुरुवात एलन मस्क ने (Elon Musk)...

Tesla Car || टेस्ला कार ची सुरुवात एलन मस्क ने (Elon Musk) केलीच नाही.टेस्लाची सुरुवात करणारे होते 2 इलेक्ट्रिकल इंजिनियर्स.

टेस्ला कार जगातील एक मोठा नाव. Tesla Car म्हटले की डोळ्यासमोर येतो ते म्हणजे अतिसुंदर डिझाईन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान असलेली एक उत्तम पर्यावरण पूरक चार्जिंग वर चालणारी चारचाकी. जीने इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची संकल्पना सहज मोडीत काढली. आज टेस्ला म्हटलं की लगेच समानार्थी शब्द डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एलन मस्क(Elon Musk). याचा समानार्थी शब्दच म्हणा हवं तर. पण ह्या Tesla Car कंपनीची सुरुवात केलीच नाहीये तर ती केलीये दोन इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असलेल्या मित्रांनी. चला तर मग जाणून घेऊया कोण होते ते आणि कशी झाली सुरुवात ….

टेस्ला कारची(Tesla Car) सुरुवात.

एलन मस्क म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अवकाशात सोडलेल्या रॉकेट परत पुनर्वापरासाठी पृथ्वीवर यशस्वीपणे आणणारा मनुष्य बरोबर? मानवाची मंगळवार ती वस्ती करण्याची कल्पना मांडणारा व्यक्ती आणि ट्विटर चा मालक दिसला चा समानार्थी शब्द म्हणजे Elon Musk.
पण ह्या टेस्लाची सुरुवात करणारी दोन माणसं आहेत ज्यांची नावं आपण कधीतरीच ऐकली असतील ते नाव म्हणजे मार्टिन एबरहार्ड. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअ असलेल्या मार्टिनची ओळख मार्क टारपेनिंगशी झाली. झालं ह्यांची गट्टी जमली आणि दोघांनी मिळून व्यवसाय करायचा ठरवलं. त्यांनी Novomedia नावाने बुक रीडर बनवले आणि अवघ्या तीन वर्षात त्याचे वीस हजारहून जास्त रीडर विकले गेले. यातून त्यांनी चिक्कार पैसा कमावला आणि त्यांची ती कंपनी आजच्या भारतीय रुपयात विचारलं तर तब्बल 15 अब्ज रुपयांना विकले.

आता माणसाकडे पैसा आल्यावर माणसाच्या विचारांना आभाळ सुद्धा कमी पडतो तसंच झालं या मार्टिन बाबा बरोबर. मार्टिन भाऊला घ्यायची होती एक स्पोर्ट्स कार. पण भाऊ म्हणले असली इंधनावर चालणारी आणि रानटी ड्र्रम ड्रूम करणारी कार नको. आणि मार्टिननं ठरवलं आपण आपलीच कार कंपनी काढायची. मग मार्टिन भाऊने आपला जुना मित्र मार्क टारपेनींग ला प्रस्ताव दिला इलेक्ट्रिक कार बनवण्याचा.

Tesla's Founder Martin Eberhard and Marc Tarpenning
Tesla’s Founder Martin Eberhard and Marc Tarpenning

एक जुलै २००३ रोजी त्यांनी निकोलस टेस्ला या शास्त्रज्ञानाच्या नावावरून ही कंपनी रजिस्टर केली आणि त्यांनी त्यांच्या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली ते मॉडेल म्हणजे रोडस्टर!!. इतर कार सारखं परंपरागत इंधनावर चालणारे इंजिन वापरता त्यांनी त्यात लिथिनम आयन बॅटऱ्या वापरण्याची कल्पना केली. पण हे सगळं शून्यातून उभं करणे तसं थोडं अवघड होतं मग त्यांनी यात काय करता येईल याचा शोध सुरू केला आणि मग त्यांनी एसी प्रोपलशन (AC Propulsion) ह्या कॅलिफोर्नियातील एका मोटर कंपनी आणि ब्रिटनची लोटस(Lotus) या कार कंपनीची भागीदारी करायचं ठरवलं.

एसी प्रोपलशन कंपनीला एक इलेक्ट्रिक कार बनवण्याचा अनुभव होतास आणि ही इलेक्ट्रिक कार तिच्या वेगासाठी प्रसिद्ध झाली होती.ही कार ६० मैलाचा स्पीड फक्त चार सेकंदात पकडत होती. मार्टिन ने लोटस कंपनीचीलोटस एलिसही गाडी आणि एसी प्रोपलशनचं मोटर तंत्रज्ञान वापरण्याच ठरवलं हा तिढा सोडवला. एसी प्रोपालशन ची मोटार आणि लोटस कंपनीची कार वापरून त्यांनी एक कार बनवले. 2004 च्या शेवटपर्यंत या प्रयोगामुळे त्यांच्याकडचे पैसे संपायला लागले होते, या दरम्यान त्यांनी काही छोटे गुंतवणूकदार शोधले पण त्यांचा पहिला रोड स्टार मॉडेलच्या प्रोडक्शन साठी त्यांना अजून पैशाची गरज होती.

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Tesla Car कंपनीमध्ये मध्ये एलन मस्कची(Elon Musk) एन्ट्री

साल २००४ साली टेस्ला मध्ये एन्ट्री झाली एलन मस्कची. 2004 मध्ये एका ऑटो एक्सपो मध्ये त्यांची भेट झाली एलन मस्क बरोबर. त्यांनी त्यांची कल्पना Elon Musk अचाट कल्पनाशक्ती असलेल्या माणसाला सांगितली. काही कालावधी पूर्वीच एलन ने आपली पेपाल (Paypal)ही कंपनी ईबे(ebay)विकली होती. त्यामुळे अशा कल्पनेवरती पैसे लावायला एलन  कडे पैशांची कमी नव्हती. मस्क ने Tesla मधे . मिलियन म्हणजे आजचे 62 कोटी भारतीय रुपये गुंतवले. एव्हाना कंपनीने एसी प्रपोर्शनची मोटर आणि लोटस च्या कार बॉडीद्वारे मिळून हे म्यूल (mule) मॉडेल बनवलेले ते अपेक्षित पणे काम करू लागले.

हे हि वाचा : ॲपलचे तिसरे Founder 

. मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून एलोन मस्क कंपनीत सगळ्यात मोठा शेअर होल्डर झाला होता पण अजून तरी कंपनी मार्टिन एबरहर्ड आणि मार्क टारपेनिंगच चालवत होत. दोन वर्षांनी साल २००६ च्या १९ जुलै रोजी कंपनीने आपलं पहिलं मॉडेल रोडस्टार लोकांसमोर आणला आणि त्याची किंमत दहा हजार डॉलर म्हणजे तब्बल 80 लाखाच्या जवळपास असून सुद्धा फक्त दोनच आठवड्यात 100 पेक्षा जास्त कार विकल्या गेल्या.

Tesla-Roadster
Tesla-Roadster

हे ही वाचा : Jio Satellite Internet भारतीय दूरसंचारात नवीन क्रांतीचा शुभारंभ

मार्टिन एबरहर्डची हकालपट्टी

कंपनीसाठी हे खूप मोठे यश होतं आणि ह्या याच्यात भागीदार व्हायला सगळेच तयार होते आणि ह्यातच मॅनेजमेंट मध्ये कुरबुर व्हायला सुरुवात झाली, एके दिवशी 2007 च्या ऑगस्ट महिन्यात एलोन मस्क मार्टिनला सांगतो की कंपनीच्या बोर्डाची एक मीटिंग झाली आणि त्यात मार्टिनला सीईओ पदावरून काढण्याचा निर्णय झाला आहे आणि टेक्नॉलॉजी हेड हे पद त्याला देण्यात आला आहे. म्हणजे मार्टिन ने जी कंपनी सुरू केली त्यातूनच त्याला काढण्यात आलं होतं. आणि कालांतराने मार्टिनने Tesla सोडली.

2009 साली मार्टिन ने एक खटला भरला, त्यात त्यांनी असं म्हटलं की मी मार्क ने जे काम केले त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला एलोन मस्क करतोय आणि मीडियामधे खोट्या बातम्या पसरवतोय की Tesla कार कंपनी एलोन मस्क ने सुरु केलीय आणि कंपनी हेतू परस्पर एलोन मस्कला कंपनीचा निर्माता म्हणून लोकांसमोर आणतेय. ह्यावर एलोन मस्कनेही मार्टिनवर प्रती दावा ठोकला.नंतर मार्टीनने त्याच्या कोर्टातील दावा माघारी घेतला आणि कोर्टाबाहेर मार्टिन आणि एलोन ने हे प्रकरण मिटवून टाकले.
सन 2010 साली कंपनीचा शेअर  हा शेअर बाजार मध्ये लिस्ट झाला. लिस्टनंतर कंपनीने जवळजवळ 16 ते 17 अब्ज रुपये मिळवले आणि कंपनीने त्यानंतर मागे वळून कधी पाहिलेच नाही.

मार्टिन मस्क या दोघांचा ह्या कंपनीच्या यशात सारखाच वाटा आणि सहभाग आहे ज्याप्रकारे मार्टिनला त्याच्याच उभ्या केलेल्या कंपनीतून काढून टाकले ते अपमानास्पद तर होतेच पण एलोन मस्क च्या करिष्म्यापुढे तो पूर्णपणे झाकोळला गेला.तरीही आजची एक वास्तुस्थिती कायम राहील की मार्क एबरहर्ड आणि मार्क टारपेनिंग या दोघांच्या भागीदारी शिवाय ही कंपनी उभी राहिली नसती टेस्ला आज जे काही आहे ती यांच्या कष्टाशिवाय आज झाली नसती

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments