what is demat account in marathi ? ..Demat account कल्पना येण्याअगोदर म्हणजे १९९५–९६ पूर्वी शेअर्सचे शेअर सर्टिफिकेट असायचे पण आता शेअरचे देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री डिमॅट अकाउंट मधून होते.चला तर मंग जानून घेऊया काय असते Demat अकाउंट ….
डिमॅट अकाउंट म्हणजे काय ?(what is demat account in marathi )
डिमॅट अकाउंट म्हणजे De-materialized account. सोप्या भाषेत आपण याला डिजिटल किंवा पेपरलेस ट्रेडिंग म्हणूयात. जेव्हा आपण कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करतो व कंपनीच्या काही हिस्स्याचा त्याचा मालक होतो, ह्याला पुरावा म्हणून पूर्वी शेअर सर्टिफिकेट दिले जायचे हेच शेअर सर्टिफिकेट म्हणजे आजचे डिमॅट अकाउंट.(what is demat account in marathi)
डिमॅट अकाउंट मुळे या शेअर्सच्या देवाण–घेवाणीच्या प्रक्रियेमध्ये खूप सहजता आली कारण पूर्वीच्या काळी दिल्या जाणाऱ्या शेअर्स सर्टिफिकेट हरवायचे खराब व्हायचे किंवा फाटायचे आणि जर कोणी चार–पाच हजार शेअर्स घेतले तर त्याला तेवढ्या शेअरच्या सर्टिफिकेट चा ढीगच्या–ढीग सांभाळायला लागायचा. ह्या समस्येवरती उपाय म्हणून डिमॅट अकाउंट संकल्पना सुरू झाली. आजच्या काळात आपण शेअर्स घेतले किंवा IPO जरी घेतला तरी तो आपल्याला डिमॅट खात्यामध्येच मिळतो.
डिमॅट अकाउंट मध्ये आपण खरेदी विक्री केलेल्या शेअरची व म्युचल फंडाची नोंद राहते सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर जस आपल बँक अकाउंट असते तसेच डिमॅट अकाउंट. फरक इतकाच की बँक अकाउंट मध्ये आपण केलेल्या पैशाच्या देवाणघेवाणीची नोंद राहते तर डिमॅट खात्यामध्ये आपण खरेदी विक्री केलेल्या शेअर्सची नोंद राहते. डिमॅट द्वारे आपण शेअर घेऊ किंवा विकू शकतो.
डिमॅट अकाउंट कुठे उघडायचे.
डिमॅट उघडायचे असल्यास आपण शेअर ब्रोकर जसे की zerodha,grow,upstox किंवा इतर शेअर ब्रोकर्स कडे आपण डिमॅट उघडू शकतो. त्याचबरोबर जवळजवळ सर्व बँकांमध्ये सुद्धा डिमॅट खात्याची सुविधा असते.
भारतात SEBI ( Security & Exchange Board of India) शेअर बाजाराचे नियंत्रण करते. NSDL आणि CDSL ह्या depository Participants आहेत. ह्या सांस्था आपले शेअर इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये त्यांच्याकडे ठेवतात. या संस्थांच्या खाली वेगवेगळे शेअर्स ब्रोकर्स असतात ते अकाउंट उघडू शकतात.
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपले ओळखपत्र पत्त्याचा पुरावा ,फोटो ,पॅन कार्ड अशी काही कागदपत्रांची आवश्यकता असते.(what is demat account in marathi))
डिमॅट आवश्यकच आहे का?
याचे उत्तर होय असं आहे कारण जर आपल्या शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करायचा असेल तर या सर्व शेअरची खरेदी–विक्री चे जे रेकॉर्ड असते ते ह्या डिमॅट खात्यामध्ये ठेवले जाते. डिमॅट अकाउंट मध्ये किती तारखेला किती शेअर घेतले त्याची खरेदी किंमत किती होती ते किती तारखेला विकले आणि तेव्हा त्याची किंमत किती होती हा सगळा हिसाब किताब त्यात ठेवला जातो त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करायचे असतील तर आजच्या काळात डिमॅट खात्याशिवाय हे होऊ शकत नाही.
डिमॅट खात्यामध्ये व्यवहारांची नोंद कशी होते.
समजा आज आपण शेअर खरेदी केले तर आपल्या खात्यातून शेअरची जी किंमत असते ती वजा होते आणि दोन दिवसात आपण खरेदी केलेल्या शेअरची नोंद आपल्या डिमॅट खात्यात होते. पूर्वी हा नोंदीला दोन दिवस लागायचे पण 27 जानेवारी 2023 पासून याची नोंद शहर खरेदी केलेला दिवस अधिक एक दिवस अशी होते त्याला T+1 किंवा Trade+1 सायकल असे म्हणतात, आणि T+1 सायकल सुरू करणारा भारत हा दुसरा देश आहे, पहिला होता चीन.
डिमॅट चे व्यवहार कसे पहायचे?
आपल्याला जे ब्रोकर सर्विस देतात किंवा ज्यांच्याकडे आपले डीमॅट खाते उघडले आहे त्यांचा एप्लीकेशन किंवा त्यांचे वेबसाईटवर आपण आपल्या डिमॅट खात्यामधील शेअरची देवान घेवान पाहू शकतो.
एक व्यक्ती किती डिमांड खाते उघडू शकते?
जसे बँक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाते असते जसे की सेविंग अकाउंट करून अकाउंट असे वेगळे प्रकारचे अकाउंट उघडू शकतो तसे प्रकार डिमॅट मध्ये नाहीयेत. डिमॅट खात्यामध्ये असा प्रकार नसतो पण एक व्यक्ती कितीही डिमॅट खाते उघडू शकतो, त्यावर कसलेही बंधन नाहीये त्याचबरोबर तस आपण बँकेत दोन व्यक्ती मिळून एक अकाउंट उघडतो तसं आपण डिमॅट अकाउंट मध्ये सुद्धा दोन ते जास्त तीन लोक मिळून जॉईंट डिमॅट खाते उघडू शकतो.
पण समजा दोन व्यक्तींनी मिळून जॉईंट डिमॅट अकाउंट उघडले आहे आणि नंतर त्यांना त्यात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश करायचा आहे तर तसं करता येत नाही. ज्या तीन लोकांना जॉईंट डिमॅट खाते उघडायचं आहे ते डिमॅट उघडण्याचा प्रक्रिया दरम्यानच ते उघडू शकतात. जस आपल्या बँक खात्यात आपण नोमिनीच्या वारस लावू शकतो जो अभयानंतर आपल्या खात्यात रकमेचा वारस ठरतो तशीच व्यवस्था डीमॅट खात्यामध्ये पण करता येते आपण डिमॅट खात्यासाठी आपला वारस किंवा नोमिनी जो असेल त्याला आपल्यानंतर आपल्या डिमॅट खात्याचे शेअरची मार्केट मिळतात.
नवनवीन update साठी :: Click Here
डिमॅट अकाउंटचे चार्जेस?
डिमॅट अकाउंट चे चार्जेस हे ब्रोकरनुसार वेगवेगळे असतात काही ब्रोकर्स डिमॅट फ्री मध्ये देतात तर काही ब्रोकर्स दरवर्षाला AMC म्हणून तीनशे ते पाचशे रुपये घेतात. तर काही दर तीन महिन्याला AMC साधारण शंभर ते दोनशे रुपये घेतात. प्रत्येक ब्रोकरचा शेअर मध्ये गुंतवणूक केल्यानंतर लागणारा दर हा वेगवेगळा असतो. बरेचसे ब्रोकर्स आपण गुंतवणूक करतो किंवा शेअरची डिलिव्हरी घेतो तेव्हा साधारण वीस रुपये फी आकारतात, फ्री मध्ये देतात. ट्रेडिंग साठी अंदाजे प्रत्येक ट्रेलर 20 ते 30 रुपये फी घेतात.
हे ही वाचा: IPO म्हणजे काय ?
जर आपल्याकडे जुने शेअर सर्टिफिकेट असतील तर?
आपल्या वडिलांनी केव्हा आजोबा पणजोबांनी जर शेअर्स घेतले असतील तर त्यावेळेस डिमॅट ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्यावेळेस प्रत्यक्ष शेअर सर्टिफिकेट दिले जायचे. समजा आपल्याकडे जुने शेअर सर्टिफिकेट्स असतील तर आपण आपल्या ब्रोकर कडे जाऊन हे डिमॅट मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ब्रोकर कडे एक फॉर्म भरून दिल्यानंतर ते ह्याचे सर्व पालकांनी करतील व ते आपले सहर सर्टिफिकेट जमा करून त्या त्या कंपनीकडे पाठवतील व त्या बदल्यात आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये ते शेअर्स येतील
ही माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा कारण “गोष्ट हाय लय कामाची “