Dhoni हा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. आणि जगातला एकमेव कॅप्टन ज्याने ICC च्या सर्व Trophy जिंकलेल्या आहेत. तर चला जाणून घेऊयात धोनी चे असे नेतृत्व गुण ज्यामुळे आहे तो इतरांपेक्षा वेगळा…
1.Dhoni चा Self Awareness (सेल्फ अवेअरनेस).
2005 च्या दरम्यान ग्रेग चॅप्पेल यांची संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली होती आणि त्यांनी एक प्रयोग करून पाहिला की संघातील प्रत्येक खेळाडूंनी कॅमेरा पुढे येऊन बोलायचं जेव्हा धोनीने बोलायला सुरुवात केली तेव्हा धोनीने सांगितले की कसे त्याने प्रत्येक स्तरावर स्वतःला कसे साबित करावे लागले शालेय स्तर ,क्लब, रेल्वे आणि राज्यस्तरावर. धोनीने यात स्वतःची कौतुक अजिबात केले नाही पण अगदी मोजक्या शब्दांत आपण आपल्या तंत्रात प्रत्येक स्तरावर आपल्या दृष्टिकोनातून तंत्रात कसा बदल केला हे सांगितले. याबद्दल एका मुलाखतीत ग्रेग चॅप्पेल म्हणतात “ह्या गोष्टीने धोनीने सर्वांना खूप प्रभावीत केले अशा प्रकारची खेळाची समज आणि Self Awareness क्वचित कोणत्या युवा खेळाडूंकडे असतो”.
2.अपयशाची जबाबदारी
एकदा शाळेतील संघाने खूप वाईट पद्धतीने सामना हरला, फलंदाजांनी फटके मारण्याचा नादच विकेट गमावल्या आणि संघ खूप वाईट रीतीने हरला तेव्हा शिक्षा म्हणून सर्व संघाचे प्रशिक्षक होते त्यांनी सगळ्यांना चालत शाळेत जायला सांगितले मे जूनच्या कडक उन्हात पोरांना पाच-सहा किलोमीटर चालत जायचं होतं.ह्या असल्या उन्हात पोरं चालत येणार म्हणून सरांना चिंता वाटायला लागली तेवढ्यात त्यांनी पाहिलं की धोनी सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन येतोय. शिक्षा दिल्यावर काही सहकारी तक्रार करायला लागले तेव्हा धोनी त्यांना समजत मनाला चूक केली तर शिक्षा तर मिळणारच.
3.Dhoni चा शांत आणि फोकस स्वभाव
दोन्हीचा लहानपणीचा मित्र सीमंत लोहानी सांगतो धोनी लहानपणापासून शांत आहे. डिस्ट्रक्शनचा आणि धोनीचा लांबपर्यंत संबंध नाही. प्रत्येक गोष्टीत पूर्ण झोकून द्यायचा गुण धोनीमध्ये लहानपणापासूनच आहे त्यामुळे कोणत्याही खेळात त्याला हरवणे अशक्य होते. सामन्याची परीस्तिथी काहीही असो धोनी नेहमी शांतच राहिला, मंग तो सामना २०-२० worldcup मधील चा पाकिस्तान विरुद्धचा अंतिम असो कि IPL मधला कोणताही सामना असो. शेवटचा बॉल होत नाही तो पर्यंत सामना हरलो नाही हे धोनीचा मत.
4. Dhoni चे सिम्पल थिंकिंग
दोन्ही नेहमी गोष्टी एकदम सिम्पल ठेवण्याच्या बाबत आग्रही राहिला आहे. 2013 जेव्हा भारतीय संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वीच आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे(spot fixing) वातावरण ढवळून निघालो होतो ह्या एका तासाच्या पत्रकार परिषदेत धोनीला केवळ फिक्सिंग बद्दल प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होता पूर्ण संघ एकदम खचला होता.
अरुण पंडित धोनीचा बालमित्र आणि तेव्हाचा मॅनेजर यांनी धोनीला विचारले बातम्यांमध्ये खूप नकारात्मक चर्चा चालू आहे तेव्हा धोनी शांत राहिला आणि “म्हणाला तू काय तू काय चुकीचं केलं आहेस ,नाही? मी काही चुकीचे केला आहे, नाही? मग चिंता कसली करायची .यानंतर संघ इंग्लंडला पोहोचला आणि दोन्हीने आपली जादू केली होती अशा पार्श्वभूमीवर संघामध्ये आयसीएस चॅम्पियन ट्रॉफी(Icc champions trophy) पण जिंकली.
धोनी कायम ह्या गोष्टीवर आग्रही होता की प्रत्येक गोष्ट एकदम सिम्पल ठेवल्या पाहिजेत, त्याने डोक्याला जास्त विचार येत नाही आणि मूडही चांगला राहतो आणि ह्यामुळे संघाचा परफॉर्मन्स चांगला राहतो. त्यामुळे सामना जिंकू अगर हरो धोनी कॅप्टन असला की टीम मीटिंग फक्त दोन मिनिटे व्हायची. धोनी फक्त म्हणायचं “मिटिंग नंतर सर्वजण बरोबर जेवण करतील, प्रत्येक सामना जिंकणं शक्य नाही Best Of Luck”
5.Dhoni ची निर्णय क्षमता
२००७ च्या ट्वेंटी -ट्वेंटी विश्वचषकाची फायनल कोण विसरू शकेल. त्यात शेवटचे ओव्हर जोगिंदर शर्माला देण्याचा निर्णय असो, किंवा 2011 च्या विश्वचषक मध्ये फॉर्म मध्ये असलेले युवराजच्या जागी पाचवा नंबरला बॅटिंगला स्वतः येण्याचा निर्णय असो, निर्णय घ्यायचा आणि होणाऱ्या परिणामांना स्वतः सामोर जायचं हा धोनीचा पिंडच. बरं पण कठीण काळात तीच लोक निर्णय घेतात ज्यांना स्वतःवर दृढ विश्वास असतो जे प्रत्येक निर्णयाच्या जबाबदारी घेतो आणि अपयशाला हँडल करतो. म्हणूनच जेव्हा टीम मॅच हरायची तेव्हा धोनी स्वतः पत्रकार परिषदेत येऊन कर्णधार म्हणून मीच पराभवाला जबाबदार आहे असा म्हणायचं, आणि जेव्हा टीम मॅच जिंकायची तेव्हा ज्या खेळाडूने सामन्यात सर्वोत्तम खेळ केलाय त्याला पत्रकार परिषदेत पाठवायचा.
6. Dhoni ची मनशांती आणि स्वतःची ओळख
विराट कोहली जेव्हा आपल्या करिअरच्या बॅड पाच मधून जात होतात तेव्हा त्याच्या जवळचे मित्र नातेवाईक सोडले तर फक्त एक व्यक्ती कोहलीच्या मदतीला आला तो म्हणजे धोनी. धोनीने कोहलीला फोनही केला आणि एक SMS केला ह्यात धोनीने कोहलीसाठी लिहले होते. “जेव्हा लोक तुम्हाला मानसिकरित्या खंबीर समजतात आणि जेव्हा तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात तेव्हा लोक तुम्हाला विचारायचं विसरून जातात की तू कसा आहेस”.
कोहली म्हणतो ह्या गोष्टी माझ्या मनाला स्पर्श करून गेली कारण लोक मला मेंटली स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट समजत समजतात आणि कधी कधी आपण तसं समजून आपन आपल्याकडून तीच अपेक्षा करायला लागतो पण असं काही असेल तर आपल्याला ह्या अपेक्षांपासून दूर जाऊन मनाला थोडा आराम देण्याची गरज असते.
7.धोनी चे Visualisation & Preparation Technique
धोनीने एका मुलाखत दरम्यान म्हटलं होतं
“मला चांगलं माहिती माझं डोकं कसं काम करतं.मी जास्त आकडेवारी मध्ये विश्वास ठेवत नाही कोणत्याही सामन्याचा प्लॅन सामने अगोदर कधीच करत नाही जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा परिस्थितीनुसार माझ्या डोक्यात प्लॅन तयार होतात.मी visualise करतो आणिआपोआप प्लॅनिंग माझ्या डोक्यात येत जातं”.
हे ही वाचा : कोण आहे महान सचिन तेंडूलकर Vs विराट कोहली.
8.धोनी चा उत्साह
२०११ पनंतर धोनीला प्रादेशिक सेनेमध्ये(Territorial Army) लेफ्टनंट कर्नल पद देऊन धोनीचा गौरव करण्यात आला.धोनीसाठी हा क्षण खूप होता आणि उत्साहात धोनीला झोपसुद्धा आली नाही आणि त्यारात्री आपली वर्दी ही बदलली नाही. धोनीचा असा मत आहे कि आपण नेहमी कोणतेही गोष्टीचा सामना करण्यास तयार उत्साहाने असावे. स्वतःला आत्मनिर्भर करण्यात येईल अशा परिस्थितीचा सामना करण्यास सदैव तयार असावे